Nerul Police Station Navi Mumbai saam tv
क्राईम

Navi Mumbai News: फुस लावून 16 वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने केले अत्याचार ; आरोपी अटकेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nerul Crime News

नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील नेरुळमध्ये(Nerul) एका १६ वर्षीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.. (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या नेरुळमध्ये राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने फूस लावून जबरदस्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधम तरुणाला अटक केली आहे. नेरुळ पोलिसांनी आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस  अधिक तपास करत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याद्यापिकेने शाळेतील ८ वर्षीय चिमुलकल्यावर अत्याचार केला होता. शाळेतील केळी वाटपादरम्यान मला निकृष्ट दर्जाची केळी दिल्याची तक्रार या विद्यार्थ्याने पालकाकडे केली होती. याचा राग मनात धरून मुख्याद्यापिकेने विद्यार्थ्यासोबत अश्लिल वर्तन केले होते.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली होती. ८ वर्षीय चिमुकला शेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होता. १५ मार्च रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आली होती. दरम्यान, मुख्याद्यापिकेने आपल्याला खराब केळी दिल्याची तक्रार ८ वर्षीय विद्यार्थ्याने पालकाकडे केली.

यावर विद्यार्थ्याच्या वडिलांनी थेट शाळा गाठत मुलांना खराब केळी का दिली? असा जाब मुख्याद्यापिकेला विचारला होता. या गोष्टीचा राग मनात धरून मुख्याद्यापिकेने विद्यार्थ्याला एका खोलीत नेले.मुख्याद्यापिकेने विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे देखील केले होते. या प्रकारानंतर ८ वर्षीय मुलगा घाबरला. त्याने शाळेतून थेट घराच्या दिशेने धाव घेत घडलेल्या प्रकार वडिलांना सांगितला होतो. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुख्याद्यापिकेविरोधात गुन्हा दाखल केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

SCROLL FOR NEXT