Business Ideas saam tv
बिझनेस

Business Ideas: फक्त १० हजारांपासून सुरू करू शकता तुम्ही 'हे' बिझनेस, मिळू शकतो लाखोंचा नफा, आजच पाहा!

Business Ideas: कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून बिझनेस करण्याचा विचार करयात. आज आम्ही तुम्हाला अशात काहीशा आयडिया देणार आहोत.

Surabhi Jagdish

तुम्हीही तुमच्या नोकरीला कंटाळला आहात. तुम्हालाही नोकरी सोडून स्वतःचा बिझनेस करायचा आहे? पण जास्त पैसे नाहीयेत, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून आम्ही तुम्हाला काही बिझनेस करण्याच्या आयडिया देणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला अशा काही बिझनेस आयडिया देणार आहोत, द्या अवघ्या १० हजार रूपयांपेक्षा कमी खर्चात तुम्ही सुरु करू शकता. या स्टार्टअप आयडिया तुम्हाला लाखोंची कमाई करून देऊ शकतात. हे बिझनेस कोणते आहेत, ते जाणून घेऊया.

घरगुती डब्याची सर्व्हिस

घरगुती डब्याची सेवा हा एक असा व्यवसाय आहे जो तुम्ही फक्त 10,000 रुपयांपासून सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीसह हा एक चांगला बिझनेस आहे. शिवाय या बिझनेसच्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

सध्या अनेकजण नोकरी करतात, त्यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अशा व्यक्तींसाठी ही सुविधा खूप उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांचं हॉस्टेल किंवा पीजीमध्ये राहणारी मुलं नेहमीच घरगुती डब्याच्या शोधात असतात. जर तुम्ही योग्य बजेटमध्ये लोकांना चांगला आणि सकस आहार दिला तर हा बिझनेस तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो.

लोणच्याचा बिझनेस

भारतीय लोकांच्या घरात आणि जेवणाच्या ताटात लोणच्याचा हमखास समावेश असतो. त्यामुळे लोणच्याचा बिझनेस हा देखील एक पर्याय आहे जो तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी खर्चात सुरू करू शकता. जर तुम्ही तुमच्या लोणच्यामध्ये चांगली चव लोकांना दिली तर फार कमी वेळात तुमचा हा छोटा बिझनेस झपाट्याने वाढू शकतो.

ऑनलाइन फिटनेस कोच

आजकाल प्रत्येक जण फीटनेसचा प्रचंड विचार करतो. कोविडनंतर ऑनलाइन जीम आणि योगा यांच्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र कामाच्या बिझी शेड्यूलमध्ये लोकं आरोग्याकडे लक्ष देणं बंद करतात. अशावेळी लोकं ऑनलाईन फीट राहण्याचे मार्ग शोधतात. या परिस्थितीत तुम्ही योग्य पद्धतीने मार्केटींग करून तुमचा हा छोटा आणि कमी खर्चिक बिझनेस सुरु करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Retention 2025: रिटेंशनचा फटाका फुटला! 43 खेळाडू कोट्यावधी; 217 खेळाडूंना डच्चू, पाहा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Updates: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार: हर्षवर्धन पाटील

Maharashtra Election: मनसेने आचारसंहिता भंग केली? दीपोत्सवातून उमेदवाराचा प्रचार?

Abdul Sattar: शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची उमेदवारी होणार रद्द?

IPL Retention 2025 : मुंबई इंडियन्सनं कुणाला रिटेन केलं? रोहित शर्मा, हार्दिक पंड्याचं काय झालं? पाहा सर्व आयपीएल संघांच्या खेळाडूंची यादी

SCROLL FOR NEXT