बिझनेस

Ladki Bahin Yojana: 'या' ठिकाणी गुंतवू शकता लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे; मिळू शकतील चांगले रिटर्न

Ladki Bahin Yojana Money Investment : महिलांनी हे पैसे खर्च न करता गुंतवावे, जेणेकरून येत्या काळात ते कामी येतील. आजकाल अशा अनेक योजना उपलब्ध आहेत ज्या तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात आणि करही वाचवतात.

Surabhi Jayashree Jagdish

राज्यात लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली असून याअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र महिलांनी हे पैसे खर्च न करता गुंतवावे, जेणेकरून येत्या काळात ते कामी येतील. मात्र आता प्रश्न असा आहे की, हे पैसे गुंतवावे कुठे?

लाडक्या बहिणींसाठी गुंतवणूक हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता. आजकाल अशा अनेक योजना उपलब्ध आहेत ज्या तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देतात आणि करही वाचवतात. अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्ही जास्त नफा मिळवू शकता.

Post Office MIS

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एक रकमी रक्कम गुंतवावी लागते. 5 वर्षानंतर, तुमची मूळ जमा रक्कम तुम्हाला परत केली जाईल. सध्या या योजनेवर ७.४ टक्के व्याज आहे. या योजनेमध्ये एकल आणि संयुक्त खात्यांसाठी ठेवीच्या वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. एका खात्यात जास्तीत जास्त 9,00,000 रुपये आणि जास्तीत जास्त 15,00,000 रुपये संयुक्त खात्यात जमा केले जाऊ शकतात. यावेळी महिलांनी खात्यात 9,00,000 रुपये जमा केले, तर तुम्हाला 7.4% व्याजाने दरमहा 5,550 रुपये कमवू शकता.

पीपीएफ

पीपीएफ या योजनेद्वारे, तुम्ही दीर्घ मुदतीसाठी चांगले पैसे कमावू शकता. नियमांनुसार, एखादी व्यक्ती त्याच्या नावावर फक्त एक PPF खातं उघडू शकते. यामध्ये आणि वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. यामध्ये वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करू शकतात. यावेळी या पैशांवर व्याज मिळवू शकता.

सध्या पीपीएफचा व्याजदर ७.१ टक्के आहे. याशिवाय PPF मध्ये 80C अंतर्गत कर लाभ मिळतो. ही गुंतवणूक ईईई श्रेणीत ठेवण्यात आलीये. म्हणजे तुमची गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT