Year End Discount Offer on Cars Saam Tv
बिझनेस

Year-End Car Deals: 4.26 लाखांच्या या कारवार मिळत आहे 55,000 सूट, 7 दिवसात वाढणार किंमत

Year End Discount Offer on Cars: मारुती सुझुकीचे काही डीलरशिप त्यांच्या Arena आणि Nexa रेंजमध्ये वर्षअखेरीस मोठी सवलत देत आहेत. मारुती आपल्या हाय मायलेज कार S-Presso वर बंपर सवलत देत आहे.

Satish Kengar

Year End Discount Offer on Cars:

मारुती सुझुकीचे काही डीलरशिप त्यांच्या Arena आणि Nexa रेंजमध्ये वर्षअखेरीस मोठी सवलत देत आहेत. मारुती आपल्या हाय मायलेज कार S-Presso वर बंपर सवलत देत आहे. भारतात S-Presso ची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते. मारुतीची एस-प्रेसो चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

याच्या कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर ही कार 7 कलर ऑप्शन्समध्ये येते. हे फायदे ग्राहकांना रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलतीच्या स्वरूपात मिळू शकतात. या कारवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंट ऑफर्सची अधिक माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मारुती सुझुकी S-Presso वर किती मिळत आहे सूट?

या महिन्यात पेट्रोलवर धावणारी मारुती सुझुकी एस-प्रेसो 35,000 रुपयांच्या रोख सवलतीसह उपलब्ध आहे. याशिवाय 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. दुसरीकडे CNG प्रकारावर 30,000 रुपयांची रोख सूट आणि 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. (Latest Marathi News)

मारुती सुझुकी S-Presso हॅचबॅक चार प्रकारांमध्ये येते. यामध्ये Std, LXi, VXi आणि VXi+ प्रकारांचा समावेश आहे. सॉलिड सिझल ऑरेंज, पर्ल स्टाररी ब्लू, सॉलिड व्हाईट, सॉलिड फायर रेड, मेटॅलिक ग्रेनाइट ग्रे, मेटॅलिक सिल्की सिल्व्हर आणि पर्ल मिडनाईट ब्लॅक या 7 रंगांच्या पर्यायांमधून ग्राहक ही कार खरेदी करू शकतात.

इंजिन

या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 68ps पॉवर आणि 89nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन स्टँडर्ड आहे. तर 5-स्पीड AMT गिअरबॉक्स पर्यायी ठेवण्यात आला आहे. या इंजिनसोबत सीएनजी किटचा पर्यायही उपलब्ध आहे. CNG मोडमध्ये याचे पॉवर आउटपुट 56.69ps पॉवर आणि 82.1nm आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT