ATM  Saam tv
बिझनेस

१०,२०,५० च्या नोटा ATM मध्ये का नाहीत? देशात चलनाचा तुटवडाय? वाचा नेमकं सत्य

ATM Cash Withdrawal System : एटीएममधून १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा का मिळत नाहीत? देशात चलनाचा तुटवडा आहे का? यावर केंद्र सरकारने स्पष्ट उत्तर दिले आहे. आरबीआयकडून लहान मूल्याच्या नोटांचा पुरेसा पुरवठा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

ATM Cash Withdrawal: यूपीआय वापरामुळे एटीएमचा वापर थोड्या प्रमाणात कमी झाला आहे. आपण एटीएममध्ये पैसे काढतो, त्यावेळी ५००, २०० आणि १०० रूपयांच्याच नोटा येतात. १०, २०, ५० च्या नोटा चलनात असून एटीएममधून का येत नाहीत? देशात चलनाचा तुटवडा तर नाही ना? असे प्रश्न मनात येत असतील. पण आता याचं उत्तर सरकारकडून देण्यात आले आहे. देशात चलनात असलेल्या १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांची कमतरता नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली.

एटीएममधून पैसे काढताना नेहमीच ५००, २०० आणि १०० रूपयांच्याच नोटा येतात. पण १०, २० किंवा ५० रुपयांच्या नोटा का सोडल्या जात नाहीत? असा प्रश्न अनेकदा पडतो. राज्यसभेत यावरून देशात नोटांचा तुटवडा आहे का? असा सवाल उपस्थित केा होता. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी चलनात या नोटांची कोणतीही कमतरता नसल्याचे सांगितले.

लहान मूल्याच्या नोटा वितरकांद्वारे कमी मूल्याच्या नोटा वितरित करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला असल्याची माहिती चौधरी यांनी मंगळवारी सभागृहाला दिली. कमी मूल्याच्या चलनाची मागणी नोटा आणि नाण्यांच्या मिश्रणाद्वारे पूर्ण केली जाते. त्याशिवाय डिजिटल पेमेंट हा आता व्यवहारांचा एक महत्त्वाचा भाग झालाय.

आतापर्यंत चलनात किती पुरवठा झाला?

२६ फेब्रुवारीपर्यंत मध्यवर्ती बँकेने १० रुपयांच्या ४३९.४० कोटी नोटा, २० रुपयांच्या १९३.७० कोटी नोटा आणि ५० रुपयांच्या १३०.३० कोटी नोटा पुरवल्या आहेत. तर गेल्या आर्थिक वर्षात (२०२५) १० रुपयांच्या १८० कोटी नोटा, २० रुपयांच्या १५० कोटी नोटा आणि ५० रुपयांच्या ३०० कोटी नोटा पुरवल्या होत्या, अशी माहिती सरकारने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT