एखाद्या कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचं मृत्यूपत्र तयार न करता अचानक निधन झालं. त्या व्यक्तीच्या नावावर घर, जमीन, बँकेतले पैसे आणि इतर मालमत्ता असेल. तर संबंधित व्यक्तीच्या पत्नीला, मुलाला, मुलीला किंवा आई-वडिलांना त्यांची संपत्ती मिळेल असं नाही. याबद्दल कायद्यात स्पष्ट नियम आहेत. ते पुढील माहितीतून जाणून घेऊयात.
एखाद्या व्यक्तीचं मृत्यूपत्र न करता निधन झालं तर त्याला कायदेशीर भाषेत 'मृत्यूपत्राशिवाय वारसा' (Intestate Succession) असं म्हणतात. हिंदू पुरुषाच्या बाबतीत हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार संपत्तीचं वाटप केलं जातं. तसेच या कायद्यानुसार पत्नी, मुलगा, मुलगी आणि मृत व्यक्तीची आई हे प्रथम श्रेणीतले कायदेशीर वारस (Class 1 Heirs) असतात. त्यांना संपत्तीत समान वाटा मिळतो. म्हणजेच मुलगा यांच्यात वारसाहक्काच्या बाबतीत भेदभाव केला जात नाही.
समजा, रमेश यांचं निधन झालं आणि त्यांनी कोणतंही मृत्यूपत्र केलेलं नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई असेल. तर अशावेळेस रमेश यांच्या मालमत्तेचे चार समान हिस्से होतील. पत्नीला एक हिस्सा, मुलाला एक, मुलीला एक आणि आईला एक हिस्सा दिला जाईल.
पत्नीचा अधिकार - कायद्यानुसार पत्नीला संपत्तीत हिस्सा मिळतोच.
मुलीचाही समान हक्क - मुलीला मुलासारखाच समान वाटा दिला जातो.
आईचाही वाटा - मृत व्यक्तीची आई हयात असेल तर तिलाही हिस्सा मिळतो.
मृत्यूपत्र असल्यावर - वैध मृत्यूपात्रनुसार संपत्तीचं वाटप होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.