8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? समोर आली मोठी अपडेट

8th Pay Commission Date: आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे. आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ८ व्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याबाबत चर्चा सुरु होती. दरम्यान, आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (8th Pay Commission)

आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच २०२५-२६ च्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यात आठवा वेतन आयोग लागू करु शकतो. सरकारने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

केंद्र मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आठव्या वेतन आयोगाची घोषणा करताना सांगितले होते की, आयोग लागू करण्याची घोषणा केल्यानंतर अंबलबजावणीसाठी पुरेसा वेळ मिळेल.त्यामुळे कदाचित पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो. (8th Pay Commission News)

केंद्र सरकारने आठवा वेतन लागू करण्यासाठी आणि ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यापूर्वी ७ व्या वेतन आयोगात २०१६ रोजी शिफारसी लागू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली आहे. अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या अंबलबजावणीबाबत निर्णय झालेला नाही. परंतु लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.

पगार किती वाढणार?

आठव्या वेतन आयोगात जर फिटमेंट फॅक्ट २.०८ निश्चित केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात १८,००० रुपयांवरुन ३७,४४० रुपये पगार वाढू शकतो. तर पेन्शन ९००० रुपयांवरुन १८,७२० रुपयांपर्यंत वाढू शकतो. जर फिमेंट फॅक्टर २.८६ झाला तर पगार १८६ टक्क्यांनी वाढू शकतो. यामुळे किमान वेतन ५१,४८० रुपये होई शकते. तर पेन्शन २५,७४० रुपये होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

Mission Marathi Movie: साखळी बॉम्बस्फोटामागंच मोठं सत्य उलगडणार, सुरेखा कुडची यांचा 'मिशन'चा ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT