बिझनेस

Whatsapp: व्हॉट्सअ‍ॅप वापरुन बना श्रीमंत! दरमहा लाखो रुपये कमवण्याचे ५ स्मार्ट मार्ग, एकदा नक्की पाहा

WhatsApp Earning: आजच्या डिजिटल युगात, व्हॉट्सअ‍ॅप फक्त चॅटिंग किंवा स्टेटससाठी नाही, तर ते आता यूजर्ससाठी कमाई करण्याचे मोठे व्यासपीठही बनले आहे.

Dhanshri Shintre

आजच्या डिजिटल युगात, व्हॉट्सअ‍ॅप आता फक्त चॅटिंग किंवा स्टेटस अपडेटसाठी मर्यादित नाही. ते कमाईचे एक मोठे माध्यमही बनले आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास, यूडर्स दर महिन्याला हजारो नाही तर लाखो रुपये कमवू शकतात. चला पाहूया व्हॉट्सअ‍ॅप वापरून पैसे मिळवण्याचे पाच स्मार्ट मार्ग कोणते? जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर फायदा मिळवण्यास मदत करतील.

WhatsApp Business सह ऑनलाइन विक्री

जर तुमच्याकडे कपडे, दागिने, वस्तू किंवा डिजिटल सेवा असेल, तर तुम्ही WhatsApp Business App वापरून तुमचे स्वतःचे छोटे ऑनलाइन दुकान सहज उघडू शकता. या अ‍ॅपमध्ये कॅटलॉग फीचर उपलब्ध आहे. जिथे तुम्ही वस्तूंचे फोटो, किंमत आणि तपशील जोडू शकता. ग्राहक थेट WhatsApp वरून ऑर्डर करू शकतात. ज्यामुळे वेबसाइटशिवाय देखील तुम्ही व्यवसाय चालवू शकता. हे छोटे व्यापारी, स्टार्टअप आणि स्वतंत्र क्रिएटर्ससाठी अत्यंत फायदेशीर साधन ठरते.

Affiliate Marketing मधून कमिशन

आजकाल अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मीशोसारख्या प्लॅटफॉर्मवरील अ‍ॅफिलिएट प्रोग्राम्स खूप लोकप्रिय ठरत आहेत. तुम्ही त्यांच्या उत्पादनांच्या लिंक तुमच्या WhatsApp ग्रुप्स किंवा कॉन्टॅक्ट्सना पाठवू शकता. जेव्हा कोणी त्या लिंकद्वारे खरेदी करतो तेव्हा तुम्हाला कमिशन मिळते. योग्य नेटवर्किंग आणि उत्पादनांची काळजीपूर्वक निवड केल्यास, तुम्ही या पद्धतीने दरमहा हजारो रुपये सहज कमवू शकता. हा मार्ग छोट्या व्यापारी आणि डिजिटल उद्योजकांसाठी फायदेशीर ठरतो.

Freelancing आणि Promotion

जर तुम्ही कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंटसारख्या फ्रीलान्स सेवा देत असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप तुमच्यासाठी एक महत्त्वाचे प्रमोशनल साधन ठरू शकते. तुम्ही तुमच्या ग्रुप्स, ब्रॉडकास्ट लिस्ट किंवा स्टेटसद्वारे तुमच्या सेवा आणि प्रोजेक्ट्सचा प्रचार करू शकता. अनेक क्लायंट्स व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधतात. ज्यामुळे व्यवहार अधिक जलद, सोयीस्कर आणि विश्वासार्ह होतात. तसेच व्यवसाय वाढवण्याच्या संधीही उपलब्ध होतात.

WhatsApp Channel ने पार्टनर जमा करा आणि कमाई करा

नुकतेच लाँच झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल्सने कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसरसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. जर तुमच्याकडे टेक न्यूज, प्रेरणा, शिक्षण किंवा फॅशनसारखे विशिष्ट कौशल्य किंवा ज्ञान असेल, तर तुम्ही तुमचा चॅनेल तयार करू शकता आणि प्रेक्षक वर्ग निर्माण करू शकता. तुमचे फॉलोअर्स वाढत राहिल्यास, ब्रँड प्रमोशन, सशुल्क भागीदारी आणि अ‍ॅफिलिएट लिंक्सद्वारे तुम्ही लक्षणीय उत्पन्न कमवू शकता. हे डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा उत्तम मार्ग आहे.

WhatsApp कस्टमर सपोर्ट एजंट

आजकाल अनेक लहान आणि मोठे व्यवसाय आपल्या कस्टमर सपोर्ट प्रणाली WhatsApp वर हलवत आहेत. जर तुमच्याकडे संवाद कौशल्य असेल, तर तुम्ही घरबसल्या WhatsApp कस्टमर सपोर्ट एजंट म्हणून काम करू शकता. अनेक कंपन्या अर्धवेळ किंवा पूर्णवेळ नोकऱ्या ऑफर करतात, जिथे तुम्ही ग्राहकांना चॅटद्वारे मदत करता. यामध्ये निश्चित मासिक पगारासोबत प्रोत्साहनही मिळते. हा मार्ग घरबसल्या पैसे कमवण्याचा आणि डिजिटल व्यासपीठावर करिअर बनवण्याचा एक सोपा आणि फायदेशीर पर्याय ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT