व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp ने ग्रुप चॅटिंगचा अनुभव जास्त सोपा आणि चांगला करण्यासाठी चार नवीन फीचर्स आणली आहेत. विशेष म्हणजे, आता ग्रुपमधले महत्त्वाचे मेसेज कायमस्वरूपी पिन करता येणार आहेत. त्यामुळे ग्रुपमध्ये शेकडो मेसेज येत असले तरी महत्त्वाची माहिती शोधण्यासाठी जास्त वेळ घालवावा लागणार नाही. नवीन फीचर्समुळे ग्रुप अॅडमिन्स आणि सदस्यांना ग्रुप मॅनेज करणं जास्त सोपं होणार आहे.
व्हॉट्सॲपवर याआधी महत्त्वाचे मेसेज 24 तास, 7 दिवस किंवा 30 दिवसांसाठी पिन करता येत होते. मात्र, आता नवीन फीचरमुळे मेसेज अनिश्चित काळासाठी पिन करता येणार आहे. जोपर्यंत संबंधित व्यक्ती तो मेसेज स्वतः अनपिन करत नाही, तोपर्यंत तो ग्रुपच्या वर दिसत राहील. यामुळे महत्त्वाच्या घोषणा, नियम आणि लिंक सहज उपलब्ध होतील.
ग्रुपमध्ये नवीन सदस्य सहभागी झाल्यानंतर त्याला आधीचे संभाषण समजावे, यासाठी नवीन सुविधा देण्यात आली आहे. आता ग्रुप ॲडमिन किंवा मॅनेजर नवीन सदस्याला जुनी चॅट हिस्ट्री शेअर करू शकतील. विशेष म्हणजे, ही चॅट हिस्ट्री एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित ठेवली जाणार आहे.
आता युजर्सना एखाद्या विशिष्ट ग्रुपसाठी स्वतंत्र स्टेटस ठेवता येणार आहे. उदाहरणार्थ, फॅमिली किंवा ऑफिस ग्रुपसाठी ठेवलेले स्टेटस केवळ त्या ग्रुपमधील सदस्यांनाच दिसेल. सदस्य त्यावर रिॲक्शन देऊ शकतील. हे स्टेटस 24 तासांनंतर गायब होईल.
ग्रुपमध्ये तुम्हाला कोणी मेंशन केले आहे किंवा तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला आहे, हे आता सहज समजणार आहे. नवीन फिल्टरच्या मदतीने असे मेसेज वेगळे पाहता येतील. यामध्ये '@all' मेंशनचाही समावेश आहे. त्यामुळे महत्त्वाचे मेसेज शोधणे सोपे होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.