WhatsApp update google
बिझनेस

WhatsApp Tips : स्मार्टफोन चोरीला गेलाय? प्रायव्हेट चॅट्स लीक होण्यापूर्वी लगेच करा 'हे' काम, अन्यथा होईल मोठा अनर्थ

Save WhatsApp Tips: स्मार्टफोन चोरीला गेला किंवा हरवला तर तुमचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित काय करावे? सिम कार्ड ब्लॉक करून त्याच नंबरवर नवीन सिम घ्या आणि दुसऱ्या फोनवर व्हॉट्सॲप पुन्हा रजिस्टर करा.

Namdeo Kumbhar

WhatsApp Hacks in Marathi : आजच्या काळात स्मार्टफोन हरवणे किंवा चोरीला जाणे मोठी डोकेदुखी ठरू शकते, कारण आपल्या फोनमध्ये वैयक्तिक फोटो, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि व्हॉट्सऐप चॅट्स असतात. अशा वेळी जर फोन चोराच्या हातात लागला, तर प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. पण घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही! अगदी काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या चोरी गेलेल्या फोनमधील व्हॉट्सऐप अकाउंट दुसऱ्या डिव्हाइसवर सुरक्षितपणे सुरू करू शकता. त्याशिवाय जुन्या फोनमधील अकाउंट ऑटोमॅटिक बंद करू शकता. जाणून घेऊयात सोपी टिक्स

स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, व्हॉट्सॲपवरचे तुमचे महत्त्वाचे चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्यात आधी तुमचे सिम कार्ड बंद (ब्लॉक) करा आणि त्याच नंबरचे नवीन सिम कार्ड घ्या. या नवीन सिम कार्डच्या मदतीने तुम्ही तुमचे जुने व्हॉट्सॲप अकाउंट पुन्हा सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही नवीन अकाउंट बनवण्याची गरज नाही.

चोर तुमच्या व्हॉट्सॲपपर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही

व्हॉट्सॲप तुम्हाला दुसऱ्या डिव्हाइसवर अकाउंट पुन्हा रजिस्टर करण्याची सुविधा देतो. यामुळे हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनमधील व्हॉट्सॲप अकाउंट आपोआप लॉग आउट होते. म्हणजेच तुम्ही दुसरा फोन घेऊन त्यात तुमचे जुने अकाउंट लॉग इन कराल, तसा जुन्या फोनवरील तुमचा व्हॉट्सॲप डेटा आणि अकाउंट बंद होईल आणि चोर अजिबात त्याचा वापर करू शकणार नाही.

पण यासाठी एक अट आहे, तुमच्याकडे त्याच मोबाईल नंबरचे सिम कार्ड असणे आवश्यक आहे, ज्या नंबरवर तुमचे व्हॉट्सॲप चालू होते. या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट अगदी सुरक्षितपणे परत मिळवू शकता आणि समोरची व्यक्ती तुमच्या खात्याचा ताबा घेऊ शकणार नाही.

जुने व्हॉट्सॲप अकाउंट पुन्हा मिळवण्याची सोपी पद्धत:

फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास सर्वात आधी तुमच्या मोबाइल ऑपरेटरला (सिम कार्ड कंपनी) कॉल करून सिम कार्ड ब्लॉक करा.

त्यानंतर त्याच नंबरचे नवीन सिम कार्ड घ्या.

नवीन सिम कार्ड सुरू (अॅक्टिव्हेट) करून ते तुमच्या दुसऱ्या फोनमध्ये टाका.

आता तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा आणि त्याच नंबरने तुमचे अकाउंट पुन्हा रजिस्टर करा.

महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:

तुमच्या जुन्या अकाउंटशी जोडलेल्या सिम कार्डशिवाय तुम्ही तुमचे अकाउंट रिकव्हर करू शकणार नाही.

हे लक्षात ठेवा की, व्हॉट्सॲप स्वतःहून तुमचे अकाउंट डीएक्टिवेट करू शकत नाही.

तुम्ही एका वेळी एकाच फोन नंबरवरून व्हॉट्सॲप अकाउंट वापरू शकता. जर तुम्ही आधी गुगल अकाउंटवर चॅटचा बॅकअप घेतला असेल, तर अकाउंट सुरू करताना तुमची सर्व जुनी चॅट हिस्ट्री रिस्टोर (परत मिळवता) करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Shivali Parab: 'पुराना ज़माना नया हो गया है...'; कल्याणच्या चुलबुलीचा बोल्ड साडी लूक, शिवालीचे मोहक फोटो व्हायरल!

Back Dark Spots : साडीमध्ये पाठ काळी दिसतेय? पाठीवरचे डाग कमी करण्यासाठी 4 झटपट उपाय

Home Fragrance: घरात 5-स्टार हॉटेलसारखं वातावरण हवंय, हे सीक्रेट्स बदलून टाकेल घराचा संपूर्ण माहोल

Pune : पत्नीला खाऊ घातले ब्लेडचे तुकडे, पतीला न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

SCROLL FOR NEXT