Vivo V40e  
बिझनेस

Vivo V40e चा धमाका; लॉन्चच्या आधीच किंमत आणि फीचर्सबाबत मोठी अपडेट आली समोर

Bharat Jadhav

Vivo लवकरच भारतात V40e लॉन्च करणार आहे. मात्र हा फोन कधी लॉन्च होणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीच तारीख जाहीर केली नाहीये. हा फोन लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स काय असतील याची माहिती समोर आलीय. एका वृत्तानुसार या स्मार्टफोनच्या रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनसह संभाव्य किंमतीबाबत मोठी माहिती समोर आलीय.

Vivo V40e ला Vivo V30e चा अपग्रेड मॉडल म्हटलं जात आहे. याआधी ऑगस्टमध्ये कंपनीने Vivo V40 Pro आणि Vivo V40 लॉन्च केले होते. आता हा नवीन फोन त्याच सिरिजमध्ये येणार आहे. Vivo V40e हा फोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार आहे. हा हॅण्डसेट दोन रंगात लॉन्च केला जाणार आहे. एक मिंट ग्रीन आणि दुसरा रॉयल ब्रॉजच्या रंगात असणार असल्याची माहिती एक सोशल मीडिया पोस्टवरून देण्यात आलीय.

Vivo V40e सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस भारतात लॉन्च होऊ शकतो. दरम्यान, SmartPrix च्या अलीकडील अहवालात असे सूचित केले आहे की, हँण्डसेट 8GB + 128GB आणि 8GB + 256GB प्रकारांमध्ये लॉन्च केला जाणार आहे. देशात त्याची किंमत 20,000 ते 30,000 रुपये असण्याची शक्यता आहे.

Vivo India च्या अधिकृत मायक्रोसाइटनुसार, V40e मध्ये 6.77-इंच फुल-एचडी+ (2,392 x 1,080 पिक्सेल) 3D वक्र डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 93.3 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो, HDR10+ सपोर्ट आणि SGS कमी निळा लाइट स्पेफिकेशन असणार आहे. या फोनमध्ये 4,500nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह आणि 1,200nits च्या उच्च ब्राइटनेस मोडसह AMOLED स्क्रीन असणार आहे.

Vivo V40e मध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात येणार आहे. ही बॅटरी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर Vivo V40E ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह ऑरा लाइट युनिटसह येईल. यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 8-मेगापिक्सेलचा दुय्यम सेन्सर असणार आहे. हे अल्ट्रा-वाइड लेन्ससह येतील. फ्रंट कॅमेरामध्ये 50-मेगापिक्सलचा सेन्सर असेल. V40e मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: वंचितची आघाडी!; निवडणुका जाहीर होण्याआधीच पहिली यादी जाहीर,११ उमेदवारांची घोषणा

CISF मध्ये सर्वात मोठी भरती, तब्बल ११५४१ जागा रिक्त; पात्रता अन् वयाची अट काय? जाणून घ्या...

अंतराळात स्पेससूट शिवाय किती वेळ व्यक्ती जिवंत राहू शकतो?

Lucknow Accident: सुसाट कार, मद्यधुंद चालक... ५ जणांना चिरडले, अनेक वाहनांना उडवले; भयंकर अपघाताचा VIDEO

Maharashtra News Live Updates : साखर कारखाना गाळप हंगामसंदर्भात मंत्री समितीची बैठक दुपारी 4 वाजता

SCROLL FOR NEXT