china viral bike accident airbag helmet technology saam tv
बिझनेस

Bike Safety : मस्तच! आता बाईकच्या हेल्मेटलाही एअरबॅग, व्हिडीओ झाला व्हायरल

china viral bike accident airbag helmet : चीनने तयार केल्याचा दावा केला जाणारा एअरबॅग हेल्मेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दुचाकीस्वाराचा अपघात होताच हेल्मेटमधून एअरबॅग बाहेर येऊन संपूर्ण शरीराला कव्हर करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय.

Saam Tv

दुचाकी चालवताना अपघात झाल्यास चालकाला गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो. विशेषतः डोके, मान, छाती आणि पाठीला मोठी इजा होऊ शकते. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वाराचा अपघात होताच त्याच्या हेल्मेटमधून मोठी एअरबॅग बाहेर येते आणि काही क्षणांतच संपूर्ण शरीराला कव्हर करते.

चीनमध्ये अशा प्रकारचे अत्याधुनिक हेल्मेट तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमके काय दिसते?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची सुरुवात एका दुचाकीस्वाराचा रस्त्यावर अपघात होण्यापासून होते. मोटारसायकलवरून चालक खाली पडताच त्याच्या हेल्मेटमधून क्षणातच एअरबॅग बाहेर येते. ही एअरबॅग चालकाच्या संपूर्ण शरीराभोवती पसरते आणि जमिनीवर आदळताना होणारा धक्का कमी करण्याचे काम करते.

विशेष म्हणजे, व्हिडिओच्या शेवटी एअरबॅगमधील हवा बाहेर पडते आणि चालक पुन्हा सामान्य स्थितीत दिसतो. कारमध्ये अपघाताच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग कार्यरत होतात, त्याच अनुशंगाने हे तंत्रज्ञान काम करत असल्याचे व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.

दोन चिनी कंपन्यांची नावे चर्चेत

या व्हायरल हेल्मेटचे तंत्रज्ञान चीनमधील 'Lanxi Yema Motorcycle Fittings' आणि 'Yanfeng Automotive' या दोन कंपन्यांनी विकसित केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. यापैकी Lanxi Yema ही हेल्मेट उत्पादन करणारी कंपनी आहे. तर Yanfeng Automotive ही कंपनी कारसाठी एअरबॅग, सीट बेल्ट आणि स्टीअरिंग व्हील यांसारखी सुरक्षा उपकरणे तयार करते. मात्र, या दोन्ही कंपन्यांनी अशा प्रकारचे हेल्मेट विकसित केल्याची किंवा त्यासाठी एकत्र काम करत असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे व्हायरल व्हिडिओतील हेल्मेट प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

व्हिडिओ AI ने तयार केल्याचा संशय का?

या हेल्मेटसंदर्भात कोणतीही अधिकृत उत्पादन घोषणा, प्रमाणपत्र, विक्रीसाठी उपलब्ध असलेली माहिती किंवा स्वतंत्र अपघात चाचणीचे निष्कर्ष समोर आलेले नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्यक्ष उत्पादनाचे प्रात्यक्षिक नसून AI च्या मदतीने तयार केलेला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मग व्हायरल व्हिडिओ खरा की AI ?

हेल्मेटमधून बाहेर येणाऱ्या फुल बॉडी एअरबॅगचे तंत्रज्ञान आकर्षक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते. मात्र, चीनमध्ये असे हेल्मेट प्रत्यक्ष विकसित झाल्याचा कोणताही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. कंपन्यांकडून अधिकृत माहिती आणि उत्पादनाचे प्रमाणपत्र किंवा प्रत्यक्ष चाचणीचे निष्कर्ष उपलब्ध होईपर्यंत या व्हिडिओला खरे मानता येणार नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महापौर दालनाच्या बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नगरसेवक यांचे आंदोलन

राहुल गांधी भारताचे 'मीर जाफर', विदेशात जाऊन देशाची बदनामी करणं हाच त्यांचा पॅटर्न; 'त्या' वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल

Winter Hand Sweating : हिवाळ्यात हातांना अचानक पाणी सुटतेय? दुर्लक्ष करू नका, असू शकतो त्वचेचा 'हा' गंभीर आजार

Thane Metro 5 : ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो ५ च्या कामाला गती; ट्रायलसाठी मेट्रो शहरात दाखल

Post Office Scheme: ५ वर्षांत फक्त व्याजातून कमवा ४.५० लाख रुपये! पोस्ट ऑफिसची ही योजना ठरतेय सर्वात फायदेशीर

SCROLL FOR NEXT