Kanya Sumangala Yojana Saam Tv
बिझनेस

Yojana: मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत ₹२५००० मिळणार, 'मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना' नक्की आहे तरी काय?

Mukhyamantri Kanya Sumangala Yojana UPs Initiative for Girl Empowerment: ‘मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना’ सामान्य घरातील मुलींना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. २०२४ पर्यंत १० लाखांहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशात मुलींसाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांचा लाभ सामान्य घरातील मुलींना होतो. उत्तर प्रदेशात सरकार मिशन शक्ती ५.O अंतर्गत मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना राबिवण्यात येत आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना ही खरंतर उत्तर प्रदेशातील सरकारची योजना आहे. जी मुलींच्या विकासासाठी आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत, मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक सहाय्य दिले जाते. २०२४ पर्यंत सुमारे १० लाख कुटुंबाने या योजनेचा लाभ घेतला होता.

मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना नक्की आहे तरी काय?

उत्तर प्रदेशात मुलींना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने २०१९मध्ये मुख्यमंत्री कन्या सुमंगला योयना सुरू करण्यात आली. मुलींच्या कुटुंबांना आर्थिक लाभ देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मार्च २०१९ साली ही योजना जाहीर केली होती. १ एप्रिल २०१९ रोजी ही योजना लागू करण्यात आली आहे.

सुमंगला योजनेचे फायदे

कन्या सुमंगला योजनेअंतर्गत मुलींच्या बँक खात्यात ६ श्रेणींमध्ये पैसे जमा होतात. तसेच पीएफएमएसद्वारे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात.

जन्म झाल्यावर: पहिल्या मुलीच्या जन्मानंतर ५००० रूपये दिले जातात.

एक वर्षाची झाल्यावर: २००० रूपये दिले जातात.

पहिल्या वर्गात प्रवेश मिळाल्यावर: ३०००

सहावीच्या वर्गात प्रवेश मिळाल्यावर: ३०००

नववीच्या वर्गात प्रवेश घेताना: ५०००

दहावी अन् बारावी उत्तीर्ण झाल्यावर: ७०००

मुलीच्या खात्यात एकूण २५ हजार जमा होतील.

कुणाच्या खात्यात पैसे जमा होतील?

जर अर्जदार १८ वर्षांचा नसेल तर हे पैसे थेट आईच्या खात्यात जमा होतील. जर आईचे निधन झाले तर, पैसे वडिलांच्या खात्यात जमा केले जातील. तसेच जर अर्जदार १८ वर्षांचा असेल तर, हे पैसे थेट मुलीच्या बँक खात्यात जमा होतील.

पात्रता:

मुलगी आणि तिचे पालक उत्तर प्रदेशचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

एका कुटुंबातील २ मुलींसाठी ही योजना लागू.

योजनेसाठी अर्ज करताना कुटुंबाचे उत्पन्न ३ लाख रूपयांपैक्षा जास्त नसावे.

मुलीचे वय ० ते १८ वर्षे असावे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अर्ज करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपण अर्ज करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT