No UPI Day meta ai
बिझनेस

No UPI Day : UPI यूजर्स लक्ष द्या! 2 ऑक्टोबरला ‘या’ दुकानांमध्ये QR कोड होणार बंद, कॅश ठेवा जवळ

UPI Update : २ ऑक्टोबरला काही मोबाइल दुकानदार ‘नो UPI डे’ पाळणार असल्याची माहिती आहे. MDR शुल्काच्या निषेधार्थ आंदोलन होणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या सगळेच व्यवहारासाठी UPI पेमेंटचा वापर करतात. त्यामुळे खिशात रोख रक्कम ठेवण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. लहान दुकानदारांपासून मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सपर्यंत डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असताना, आता २ ऑक्टोबरला काही दुकानांमध्ये UPI स्वीकारलं जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

UPI वरच्या MDR शुल्काच्या मुद्द्यावरून ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने २ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘नो UPI डे’ पाळण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. या दिवशी संघटनेशी संबंधित काही दुकानदार UPI व्यवहार स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निषेध म्हणून दुकानांवरील QR कोड काळ्या कापडाने झाकण्याची घोषणाही संघटनेने केली आहे.

नेमका कुठे परिणाम होणार?

UPI सेवा संपूर्ण देशभर बंद होणार नाही. या आंदोलनाचा परिणाम हा ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे सदस्य असलेल्या राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही गैर-सदस्य दुकानदारही या आंदोलनात सहभागी होऊ शकतात, असा दावा संघटनेने केला आहे.

MDR मुळे दुकानदारांची चिंता काय?

संघटनेच्या म्हणण्यानुसार, २ हजार पेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारावर ०.४ टक्के MDR लागू झाल्यावर त्याचा जास्तीचा खर्च दुकानदारांवर पडू शकतो. विशेष म्हणजे मोबाईल विक्रीमध्ये बरेच व्यवहार २ हजार पेक्षा जास्त किमतीचे असल्याने या शुल्काचा मोठा परिणाम होण्याची शक्यता दुकानदार व्यक्त करत आहेत.

उदाहरणार्थ, ३०,००० रुपयांच्या किमतीचा मोबाईल UPIच्या मदतीने खरेदी केल्यावर ०.४ टक्के शुल्काचा हिशोब १२० रुपये इतका होतो. हा खर्च ग्राहकांकडून घ्यायचा की स्वतः सहन करायचा, हा दुकानदारांसमोरचा प्रश्न असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरला संबंधित दुकानांमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी UPI सोबत पर्यायी पेमेंटची व्यवस्था किंवा पुरेशी रोख रक्कम जवळ ठेवणं उपयोगी ठरू शकते. पण प्रत्यक्षात कोणती दुकाने या आंदोलनात सहभागी होतील, हे स्थानिक पातळीवर बदलू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajma vs Chole Rice : राजमा-भात की छोले-भात? जास्त प्रोटीन कुठून मिळतं, आजपासून डाएटमध्ये करा समावेश

Akshaye Khanna: अक्षय खन्नाने मुंबईच्या पॉश भागात घेतला आलिशान फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क

Accident: भीषण अपघात! कार खोल दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू

अजित पवारांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक; भाषण करताना डोळ्यात अश्रू, VIDEO

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील CJP आंदोलन तीव्र करणार

SCROLL FOR NEXT