UPI ID Transaction Saam Tv
बिझनेस

UPI ID Transaction : केंद्राचा मोठा निर्णय; ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना दिलासा, १० जानेवारीपासून नवे नियम लागू

UPI Transaction Limit Exceeds : NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजेच RBI यावर समस्येवर उपाय शोधला आहे. ज्यानंतर ५ लाख रुपयांचे UPI पेमेंट केले जाऊ शकते. यामध्ये सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत. जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

RBI Monetary Policy :

ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना केंद्र सरकाराने आनंदाची बातमी दिली आहे. सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन पेमेंटचा भरपूर वापर केला जातो. सध्याच्या ऑनलाइन युगात फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या युपीआय आयडीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.

ऑनलाइन (Online) पेमेंटची सुविधा सुलभ करण्यासाठी सरकारने एका दिवसात १ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर बंदी घातली होती. पण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने म्हणजेच RBI यावर समस्येवर उपाय शोधला आहे. ज्यानंतर ५ लाख रुपयांचे UPI पेमेंट (Payment) केले जाऊ शकते. यामध्ये सरकारने काही अटी घालून दिल्या आहेत जाणून घेऊया.

1. पेमेंट १ लाख रुपयांवरुन ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली

NPCI ने हॉस्पिटल आणि शाळेच्या संस्थांसारख्या अत्यावश्यक संस्थांच्या पेमेंटसाठी एकावेळी ५ लाख रुपयांच्या ऑनलाइन पेमेंटमध्ये सूट दिली आहे. हा नवा नियम १० जानेवारीपासून लागू होणार आहे. एनपीसीआयने बँका (Bank) आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना अॅडव्हायजरी जारी केली आहे.

2. पेमेंट मर्यादेत वाढ

NPCI ने व्यापाऱ्यांसाठी १ लाख ते ५ लाख रुपयांची पेमेंट मर्यादा लागू केली आहे. त्यासाठी त्यांना पेमेंट मोड म्हणून यूपीआय अॅक्टिव्ह ठेवणे गरजेचे आहे. नॅशनल पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया (NPCI)द्वारे पेमेंटची मर्यादा दिवसासाठी १ लाख रुपये इतकी ठेवली आहे. मागच्या पतधोरणाच्या बैठकीत RBI ने ५ लाख रुपये पेमेंट मर्यादा दिली. यामुळे Paytm, Google Pay आणि PhonePe सारख्या पेमेंट अॅप्सना फायदा होईल.

3. UPI पेमेंटमध्ये भारत अग्रेसर

२०२३ मध्ये UPI पेमेंटच्या बाबतीत भारताने १०० अब्जाचा आकडा पार केला आहे. या संपूर्ण वर्षात ११८ अब्ज रुपयांचे UPI पेमेंट करण्यात आले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flipkart BBD Sale: मोबाईलप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! Google Pixel 9 वर बंपर ऑफर, जाणून घ्या किंमत

Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

Maharashtra Live News Update: नळदुर्गमध्ये सकल हिंदू समाजाने काढला मुक मोर्चा

Satara Tourism: आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभव हवा असेल तर साताऱ्यातील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Asia Cup 2025 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT