UPI Transaction Failed  Saam Tv
बिझनेस

UPI Transaction Failed : यूपीआय ट्रांजेक्शन फेल, खात्यातून पैसेही झाले कट? कसा मिळेल रिफंड

कोमल दामुद्रे

Reasons Why UPI Transaction Fail :

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. पैसे पाठवण्यासाठीही आपण ऑनलाईन पेमेंटचा वापर करतो. ऑनलाईन बँकिंगमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. हल्ली Google Pay, Phonepe, Paytm आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पैसे ट्रान्सफर करताना आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.

बरेचदा पैसे ट्रान्सफर करताना आपण पिन विसरतो किंवा ट्रांजेक्शन फेल होते. अशावेळी खात्यातून पैसे देखील कट होतात. यूपीआय पेमेंटमुळे आपण क्यूआर कोड स्कॅन करुन पैसे पाठवू शकतो. परंतु, खात्यातून पैसे कट होऊन समोरच्या पर्यंत पोहोचले नाही तर आपल्याला टेन्शन येते. जर तुमच्यासोबतही असे झाले तर रिफंड कसा मिळवाल हे जाणून घेऊया.

1. UPI Transaction फेल का होते?

बरेचदा पैसे (Money) ट्रान्सफर करताना हे फेल होतात याचे कारण स्लो इंटरनेट. तुमचा फोन जर इंटरनेटशी व्यवस्थितरित्या कनेक्ट नसेल किंवा फोनला रेंज नसेल तर ट्रांजेक्शन फेल होते. बँकेचे (Bank) सर्व्हर काम करत नसतानाही समस्या येते. दैनंदिन व्यवहार मर्याद जास्त झाली असेल तेव्हाही असे होते.

2. UPI Transaction फेल झाल्यास काय करावे?

तुमचे पेमेंट फेल झाल्यास खात्यातून पैसे कट होतात. अशावेळी काळजी करु नका. अनेकदा पैसे कट झाल्यानंतर २४ तासांच्या आत खात्यात पैसे परत येतात. तसे न झाल्यास बँक कस्टमर केअरला फोन (Phone) करुन तक्रार करु शकतो. यूपीआय संबंधित तक्रार ही NPCI वेबसाइटवर नोंदवता येतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

SCROLL FOR NEXT