सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट केलं जातं. भाज्या आणण्यापासून ते शाळेची फीपर्यंत आपण ऑनलाइन पेमेंट करतो. पण आता UPI वापरणाऱ्यांना ठरावीक रक्कमेनंतर जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे बँकांना ATM मध्ये पुरेशी रोकड उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. १५ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नव्या UPI शुल्क व्यवस्थेमुळे काही काळासाठी ATM मधून रोख रक्कम काढण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होत असल्याने रोख पैशांची मागणीही वाढण्याची शक्यता आहे.
नव्या Merchant Discount Rate (MDR) व्यवस्थेनुसार, ₹2,000 पेक्षा जास्तीच्या काही Person-to-Merchant (P2M) UPI व्यवहारांवर ०.४ टक्के MDR आकारला जाणार आहे. ₹७५,००० किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी MDR ची मर्यादा ₹३०० असेल. मात्र, ₹२,००० पर्यंतच्या P2M व्यवहारांवर शुल्क लागू होणार नाही. तसेच Person-to-Person (P2P) UPI व्यवहार शुल्कमुक्त राहतील. सरकारच्या फ्रेमवर्कनुसार, संख्येच्या आधारावर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त P2M UPI व्यवहार हे ₹२,००० पेक्षा कमी असल्यामुळे शुल्काच्या बाहेर राहतील.
या बदलामुळे काही ग्राहक आणि व्यापारी पुन्हा रोख व्यवहारांकडे वळण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार आणि RBI परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत. दरम्यान, देशातल्या ATM नेटवर्कमध्ये गेल्या काही वर्षांत घट झाली आहे.
RBI आकडेवारीनुसार, मार्च २०२५ शेवटी देशात २,५१,०५७ ATM होते. एका वर्षाआधी ही संख्या २,५३,४१७ होती. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडे १,३३,५४४ , तर खासगी बँकांकडे ७७,११७ ATM होते. White-label ATM ची संख्या ३६,२१६ होती.
डेबिट कार्डद्वारे ATM मधून कॅश काढण्याचे व्यवहारही घटले आहेत. FY23 मध्ये सुमारे ६८,९७५ लाख व्यवहार झाले होते, तर FY26 मध्ये ते सुमारे ५३,३९४ लाखांवर आले. याच काळात ATM मधून काढलेल्या रोख रकमेचे मूल्य ₹३२.८ लाख कोटींवरून सुमारे ₹२८.५ लाख कोटी झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.