Lek Ladki Scheme Saam Tv
बिझनेस

Lek Ladki Scheme: मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकार देत आहे 75 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे योजना

Maharashtra Government Schemes: मुलींच्या शिक्षसांसाठी राज्य सरकार देत आहे 75 हजार रुपये, जाणून घ्या काय आहे योजना

साम टिव्ही ब्युरो

Lek Ladki Scheme: महाराष्ट्र सरकारने 10 मार्च रोजी 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पांतर्गत सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर केली होती.

या योजनेचे नाव लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojna) असे ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत पात्र मुलींना महाराष्ट्र सरकार 75 हजार रुपयांची रोख रक्कम देणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली होती.

तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, महाराष्ट्र सरकार मुली आणि महिलांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. हे लक्षात घेऊन सरकार राज्यातील मुली आणि महिलांच्या आरोग्य, आर्थिक सुरक्षा आणि इतर गरजांसाठी अनेक उपाययोजना राबवणार आहे. (Latest Marathi News)

जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा?

मुलींच्या सक्षमीकरणासाठी सरकारने लेक लाडकी नावाची नवीन योजना आणल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

या योजनेंतर्गत पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर 5000 रुपये, इयत्ता 4000 रुपये, इयत्ता 6000 रुपये आणि इयत्ता 11वीमध्ये 8000 रुपये दिले जातील. लाभार्थी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पुढील अभ्यासासाठी 75,000 रुपये रोख दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Gen Z वर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा- राज ठाकरे

Political News : राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत, एकाचवेळी दिल्ली आणि राज्यात हालचाली

Sanjay Raut: निवडणूक आयोगानं आमचा पक्ष विकला, शिवसेना पक्ष अन् चिन्हावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

Gold Price Today: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा 24K, 22K आणि 18K चे ताजे दर

स्वातंत्र्यदिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंग्याच्या रंगातील 5 रेसिपी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील

SCROLL FOR NEXT