Gold Price Today google
बिझनेस

Gold Rate News: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण; 24K सोने ₹2,070 ने स्वस्त, आजचे ताजे भाव पाहा

Gold and Silver Rates Today: सोनं - चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. २४ कॅरेट सोन्याच्या तोळ्यामागे २०७० रुपयांची घसरण झाली असून चांदीत आत्तापर्यंत ४५ हजारांनी घसरण झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळतेय. मध्येच हे दर वाढले सुद्धा होते. मात्र आजच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट (24K TOLA) १ तोळं सोन्याच्या किंमतीमध्ये २,०७० रुपयांनी घसरण झाली. तर चांदीच्या दरात ५ हजारांनी घसरण झाली झाली.

अमेरिका आणि इराण यांच्यातल्या शांततेच्या करारानंतर जागतिक बाजारात बदल होताना पाहायला मिळत आहे. युद्धाच्या दिवसांमध्ये महागाई वाढत चालली होती. तर त्याचा परिणाम आता सोन्याच्या किंमतींवरही होत होत होता. पण अमेरिका - इराणच्या शांततेच्या करारानंतर सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार आज अनेक शहरांमध्ये सोनं-चांदीच्या किंमतीत (Today Gold Silver Rate) घट झालेली पाहायला मिळतेय.

मुंबईतील आजचा सोन्याचा भाव (Today Gold Rate 24K Per Gram In Mumbai)

मुंबईत आज २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,५९१ रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,१६,७२८ रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,४५,९१० रुपये आहे.

मुंबईत आज २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १३,३७५ रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत १,०७,००० रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,३३,७५० रुपये आहे.

मुंबईत आज १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १०,९४४ रुपये आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याची किंमत ८७,५५२ रुपये आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,०९,४४० रुपये आहे.

Gold Price Today

मुंबई, पुणे, कोलकाता, बंगलोर, केरळ या शहरांमध्ये सारख्या किंमती आहेत. तर दिल्लीमध्ये २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,६०६ आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅमची किंमत १३,३९० रुपये आहे. तर १८ कॅरेट १ ग्रॅमची किंमत ११,३४० रुपये आहे.

चांदीचा आजचा भाव (Silver Rate Today)

Goodreturns च्या आकडेवारीनुसार चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज महाराष्ट्रासह दिल्लीत चांदीचा भाव प्रति किलो ५,००० रुपयांनी कमी होऊन २,४५,००० रुपयांवर आला. तसेच जून महिन्यात आतापर्यंत चांदीच्या दरात ४५,००० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT