Gold Price Today google
बिझनेस

Gold Price Today: सोनं खरेदीची मोठी संधी! आठवडाभरात 3 हजारांनी घसरले दर, आजचा भाव किती?

Gold and Silver Rates Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे. सोन्याच्या किंमतीतला बदल सर्वसामान्यांसाठी दिलासादायक असणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या सोनं-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळतोय.याचा किंमती २ महिन्यांपासून स्थिर नाहीत.एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याची किंमत ३००० रुपयांपर्यंत घसरली. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत २७५० रुपयांनी स्वस्त झाली. आज २१ जून रोजी मुंबईत २४ कॅरेट १ तोळं सोन्याची किंमत ही १४६०८० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम किंमत ही १४,६०८ रुपये आहे.

मुंबईतील आणि कोलकत्ता

मुंबईत आणि कोलकत्त्यामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत १३३९०० १ तोळं आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ही १४६०८० रुपये १ तोळं आहे.

दिल्लीमधील सोन्याची किंमत

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची १० ग्रॅम १४६२३० आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव हा १३४०५० रुपये इतका आहे.

चैन्नईतील सोन्याची किंमत

चैन्नईत आजचा भाव २४ कॅरेट १० ग्रॅम १४८३७० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव हा १३६००० रुपये इतका आहे.

पुण्यात आणि बंगळूरूमधला सोन्याचा भाव

पुणे आणि बंगळूरू मध्ये सोन्याच्या किंमती सारख्या आहेत. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १४६०८० रुपये आहे. तर २२ कॅरेट १ तोळा सोनं हे १३३९०० रुपये आहे.

चांदीचा आठवड्याभराचा दर

चांदीच्या किंमतीमध्ये आठवड्याभरात घसरण पाहायला मिळाली. एका आठवड्यामध्ये चांदीच्या किंमतीत १०,००० रुपयांची घसरण झाली. २१ जूनच्या सकाळी चांदीचा भाव किलोग्राम २,५०,००० रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव ६४.७३ डॉलर प्रति औंस आहे. १ औंस म्हणजे अंदाजे २८.३५ ग्रॅम असतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना बसला मोठा धक्का! एकाच झटक्यात भाव गगनाला भिडले, काय आहेत नवे दर?

Maharashtra News Live Update: ....अन्यथा मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांचा व शासकीय वाहनांचा लिलाव करणार- रविकांत तुपकर

Cardamom Benefits : सलग १५ दिवस वेलची खाल्ल्याने शरीरात होतील 'हे' ६ महत्त्वाचे बदल

Career Horoscope : आजपासून ‘या’ ५ राशींचं नशीब पालटणार! कामाचा ताण होईल कमी अन् पैशांचा पाऊस पडणार

Earphone side effects: इअरबड्स काढल्यानंतरही कानात शिट्टीसारखा आवाज ऐकू येतोय? शरीराचा हा इशारा अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT