TCL Thunderbird Sparrow 5 SE smart TV Saam Tv
बिझनेस

New Android TV: फक्त 10 हजारात मिळत आहे 43 इंचाचा Smart TV, साउंडही दमदार; जाणून घ्या संपूर्ण माहिती

TCL TV: तुम्हीही कमी किमतीत मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. TCL ब्रँड तुमच्यासाठी एक स्वस्त आणि मस्त टीव्ही घेऊन आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

TCL Thunderbird Sparrow 5 SE smart TV:

तुम्हीही कमी किमतीत मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. TCL ब्रँड तुमच्यासाठी एक स्वस्त आणि मस्त टीव्ही घेऊन आला आहे. कंपनीने बजेट- फ्रेंडली FFALCON सीरीज स्मार्ट टीव्ही 2024 Thunderbird Sparrow 5 SE लॉन्च केला आहे. टीव्हीमध्ये 43 इंच डिस्प्ले असून यात पॉवरफुल स्पीकर्स देण्यात आले आहेत. या टीव्हीची किंमत 10,500 रुपयांपेक्षा कमी आहे. याच टीव्हीच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

किंमत आणि उपलब्धता

कंपनीने सध्या हा टीव्ही चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा टीव्ही चीनमध्ये JD.com वर 889 युआन ($125 म्हणजे अंदाजे 10,400 रुपये) मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

TCL Thunderbird Sparrow 5 SE फीचर्स

Thunderbird Sparrow 5 SE स्मार्ट टीव्हीमध्ये 1920x1080 पिक्सेल रिझोल्यूशनला सपोर्ट करणारा 43-इंच डिस्प्ले देण्यात आता आहे. जो 60Hz रिफ्रेश रेटसह VA पॅनेलसह सुसज्ज आहे. टीव्ही HDR10 ला सपोर्ट करतो. स्मार्ट टीव्हीमध्ये 1GB रॅम आणि 8GB इनबिल्ट स्टोरेज आहे. हा टीव्ही क्वाड-कोर A53 प्रोसेसरने सुसज्ज आहे. जो सर्व ॲप्स चांगल्या प्रकारे ऑपरेट करतो. टीव्ही वेगाने बूट होतो आणि कंपनीचा दावा आहे की, तो फक्त 2 सेकंदात सुरू होतो.

टीव्ही रिमोट कंट्रोलसह येतो, ज्याद्वारे तुम्ही त्याचा यूजर इंटरफेस आणि इतर गोष्टी कंट्रोल करू शकता. तसेच दमदार साऊंडसाठी टीव्ही फुल-रेंज, हाय-पॉवर स्पीकर्ससह सुसज्ज आहे. हा टीव्ही Android 13 OS वर काम करतो.

यात वायरलेस स्क्रीन मिररिंग, मल्टी-स्क्रीन इंटरॅक्शन इंटरॅक्शन ॲप्स आणि ऑनलाइन कॉन्टेन्टमध्ये प्रवेश यासह अनेक स्मार्ट फीचर्स ग्राहकांना मिळतात. हा टीव्ही TUV Rhineland प्रमाणित आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात दोन HDMI 2.0 पोर्ट, एक इथरनेट पोर्ट, एक USB-A 2.0 पोर्ट आणि एक AV इनपुट पोर्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: थकीत बिलासाठी कंत्राटदारचा आत्मदहनाचा प्रयत्न

Actress Accident: 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, बसनं दिली धडक

Kangana Ranaut: 'डेटिंग अ‍ॅप्स 'गटार' आहेत'; कंगना रनौतला नाही आवडत डेटिंग अ‍ॅप्स, कारण सांगत म्हणाली...

MLA Ashish Deshmukh : बाईकवर स्टंट करणं भाजप आमदाराला पडलं महागात, पोलिसांनी केली मोठी कारवाई; VIDEO व्हायरल होताच...

New cancer diagnosis method: आता केवळ आवाजाने समजणार तुम्हाला कॅन्सर झालाय ते; शास्त्रज्ञांनी शोधली नवी पद्धत

SCROLL FOR NEXT