पुणे-नागपूर स्पेशल रेल्वे धावणार, वेळ काय, कुठे कुठे थांबणार? Saam Tv
बिझनेस

Tatkal Booking Time: तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल झालाय? व्हायरल मेसेजचा IRCTC कडून भांडाफोड

Railway Tatkal Booking Time: सोशल मीडियावर रेल्वेच्या तिकीट बुकिंग बाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

Bharat Jadhav

भारतीय रेल्वे देशातील दळवळणाचं मोठं साधन बनलंय. रेल्वे एकप्रकारे देशाची जीवनवाहिनी आहे. देशातील कोट्यवधी लोक रेल्वेतून प्रवास करतात. आपल्यातील अनेकजण रेल्वेचं तिकीट तात्काळ पद्धतीने करत असतात. पण सोशल मीडियावर मात्र तात्काळ तिकीट बुकिंगबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे.

या तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. १५ एप्रिलपासून तात्काळ तिकिटांची वेळ बदलण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे व्हायरल मेसेज?

रेल्वेच्या तात्काळ तिकिट बुकिंगच्या वेळेत १५ एप्रिल २०२५ पासून बदल होत असल्याची पोस्ट व्हॉट्सअॅप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर व्हायरल होतेय. प्रीमियम तात्काळ तिकिटांच्या वेळेतही बदल होत आहे. असा मेसेज व्हायरल होतोय, पण हा मेसेज खरा आहे की, नाही हे समजून ने घेता लोक एकमेकांना हा मेसेज फॉरवर्ड करत आहेत.

काय आहे खरं?

आयआरसीटीसीचे सीएमडी संजय कुमार जैन यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजबाबत प्रतिक्रिया दिलीय. व्हायरल होणारे मेसेजमध्ये कोणतीच सत्यता नाहीये. याबाबत कोणताही निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला नाहीये. आयआरसीटीसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल स्पष्टीकरण देखील दिलंय.

"आजकाल सोशल मीडियावर अशा काही पोस्ट येत आहेत, ज्यामध्ये तात्काळ आणि प्रीमियम तात्काळ तिकिटांच्या वेगवेगळ्या वेळेचा उल्लेख करण्यात आलाय. या तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. परंतु या वेळेत कोणताच बदल करण्यात आलेला नाहीये.

तात्काळ तिकीट कधी बुक केले जाते?

सध्या सर्व एसी क्लासेस (फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, सीसी, ईसी) साठी तात्काळ बुकिंग प्रवासाच्या १ दिवस आधी सकाळी १० वाजता सुरू होत असते. स्लीपर क्लास (SL) साठी बुकिंग प्रवासाच्या १ दिवस आधी सकाळी ११ वाजता सुरू होत असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या प्रवाशाची ट्रेन १५ एप्रिल रोजी सकाळी नवी दिल्लीहून निघणार असेल तर त्याचे तात्काळ बुकिंग १४ एप्रिल रोजी सकाळी केले जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homemade paratha masala recipe: घाईघाईत पराठा बनवताय? अजून टेस्टी बनवण्यासाठी घरच्या घरी बनवा सिक्रेट पराठा मसाला

Pandharpur Crime : पंढरपुर हादरले! माय लेकाची घरात घुसून हत्या; मारेकरी घराला कुलूप लावून पसार

Maharashtra Live News Update: शिंदे सेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपाईंची युती

Fried Rice Recipe: घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल फ्राईड राईस, लहान मुलं आवडीनं फस्त करतील डिश

Ind Vs Eng 4th Test : चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह- रिषभ पंत खेळणार? टीम इंडियाबाबत मोठी माहिती समोर

SCROLL FOR NEXT