Tata Curvv Look Google
बिझनेस

Tata Curvv: टाटा मोटर्सची अजून एक दमदार कार; जबरदस्त लूक आणि फीचरसह होणार लाँच

Tata Curvv : टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनीने नुकतीच टाटा पंच ईव्ही लाँच केली होती. त्यानंतर आता नवीन Tata Curvv सादर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tata Curvv Price Features And Specification:

टाटा मोटर्स ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. कंपनी ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनीने नुकतीच टाटा पंच ईव्ही लाँच केली होती. त्यानंतर आता नवीन Tata Curvv सादर केली आहे.

भारत मोबिलिटी एक्स्पो २०२४ मध्ये कंपनीने सीएनजी ते पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या संकल्पना सादर केल्या आहेत. यामध्ये Tata Curvv सादर केली आहे. (Latest News)

गेल्या वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने Curvv संकल्पना सादर केली होती. त्यानंतर कंपनीने आता कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच लाँच करणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारच्या इंटर्नल कम्बशन इंजिन व्हर्जनमध्ये 1.5 लिटर क्षमतेचे 4 सिलेंडर डिझेल इंजिन वापरण्यात येणार आहे. ही एसयूव्ही डिझेल इंजिनसह चांगले मायलेज देईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Tata Curvv कार नवीन फीचरसह सुसज्ज आहे. यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्लेसह 10.25 इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट स्क्रिन, 10.25 इंचचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मोठा पॅनोरामिक सनरुफ, 2-स्पोक स्टीअरिंग व्हील, वायरलेस चार्जिंग पॅड, व्हेंटिलेटेड सीट, एअर प्युरिफायर आणि प्रिमियम ऑडिओ सिस्टीम यांसारखे फीचर देण्यात आले आहे.

कंपनीने भारत मोबिलीटी एक्स्पोमध्ये कारचे डिझेल मॉडेल प्रदर्शित केले आहे. यापूर्वी या कारची पेट्रोल संकल्पना ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. कंपनी लवकरच कारला सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करणार आहे. या एक्स्पोमध्ये टाटा नेक्सॉन सीएनजी मॉडेल सादर केले आहे.

Tata Curvv कारचे कॉनसेप्ट मॉडेल सादर केले आहे. कंपनी लवकरच या कारचे प्रोडक्शन सुरु करणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून कारचे उत्पादन करणार आहे. त्यानंतर कार विक्रीसाठी बाजारात सज्ज होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT