Sukanya Samruddhi Yojana Saam Tv
बिझनेस

Sukanya Samruddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल; खातेधारकांनी लवकर करा हे काम, अन्यथा...

Sukanya Samruddhi Yojana Rule Change: सरकारने मुलींसाठी खास सुकन्या समृद्धी योजना सुरु केली आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांमध्ये आजपासून बदल झाले आहेत.

Siddhi Hande

भारत सरकारने आतापर्यंत अनेक योजना राबवली आहे. यात मुलींसाठीही अनेक योजना राबवण्यात आली आहे. त्यातील एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. सुकन्या समृद्धी योजनेत १ ऑक्टोबर २०२४ म्हणजेच आजपासून मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेतबाबत एक महत्त्वाचे काम लवकरात लवकर करुन घ्यायला सांगितले होते.हे काम न केल्यास तुमचे अकाउंट बंद होऊ शकते.

सुकन्या समृद्धी योजना ही मुलींना लखपती बनवून देते. या योजनेत मुलींचे अकाउंट हे तुमच्या पालकांच्या नावावर असणे गरजेचे आहे. जर सुकन्या समृद्धी योजनेतील अकाउंट आजी-आजोबांच्या नावावर असेल तर ते आजपासून बंद होईल. त्यामुळे या योजनेतील अकाउंट कायदेशीर पालकांच्या नावावर असावे.

सुकन्या समृद्धी योजना २०१५ साली सुरु करण्यात आली होती.मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत सर्व खर्च या योजनेतून केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे या दृष्टीने ही योजना सुरु केली होती. या योजनेत २५० रुपये गुंतवून खाते उघडू शकतात. या योजनेत सरकार सर्वाधिक ८.२ टक्के व्याजदर देते. सुकन्या समृद्धी योजना ही लाँग टर्म इन्वेस्टमेंट आहे. ज्यामुळे मुलींचे भविष्य सुरक्षित राहते. (Sukanya Samruddhi Yojana Rule Change)

सुकन्या समृद्धी योजनेत तुम्हाला जानेवारी-मार्च २०२४ अशा तीन महिन्यावर ८.२ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुमची मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत लखपती होऊ शकते. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. जर तुम्ही वयाच्या ५ वर्षांपासून ही गुंतवणूक केली तर २१ व्या वर्षी ६९ लाख रुपये तुमच्या मुलीच्या अकाउंटला असतील. (Sukanya Samruddhi Yojana)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : प्रसिद्ध गायिकेसोबत लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान भयंकर घडलं; कॉलेज तरुण स्टेजवर आला अन्...

Maharashtra Live News Update : धारावीत धक्कादायक प्रकार, ८ वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली

राहुरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट, निवडणूक बिनविरोध नाही; आणखी एका पक्षाचा उमेदवार रिंगणात

Backless Blouse Designs: साडी किंवा लेहेंग्यावर उठून दिसतील हे 5 बॅकलेस ब्लाऊज, नक्की ट्राय करा

Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT