Sukanya Samriddhi Yojana google
बिझनेस

Sukanya Samriddhi Yojna: सुकन्या समृद्धी योजनेचा भन्नाट फॉर्म्युला! एवढीच गुंतवणूक करा आणि मिळवा ₹50 लाख

Sukanya Samriddhi Scheme : मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत किती गुंतवणूक करावी. ५० लाखांचा निधी कसा तयार होतो, व्याजदर, करसवलत आणि मॅच्युरिटीचे संपूर्ण गणित जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ भारतात मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. सरकारच्या योजनेत सर्वात जास्त व्याज तुम्हाला दिलं जातं. ही योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. मलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि हमीदार बचत करण्याचा विचार करत असाल तर सुकन्या समृद्धी योजना हा बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये ८.२ टक्के वार्षिक वाजदर दिला जात आहे. त्यामुळे दिर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा निधी उभारण्याची संधी मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने खातं उघडून एका आर्थिक वर्षात २५० रुपये आणि १.५ लाख रुपये गुंतवता येतात. खातं उघडल्यानंतर फक्त १५ वर्ष गुंतवणूक करावी लागते. पण खातं २१ वर्षांनी मॅच्युरिटी होते. या दिवसांमध्ये तुमच्या रकमेवर व्याज जमा होत राहतं.

जर एखाद्या पालकाला मुलीसाठी ५० लाख रुपयांचा निधी तयार करायचा असेल, तर सध्याच्या ८.३ टक्के व्याजदरानुसार दरवर्षी १.०५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजेच महिन्याला ८,७५० रुपये जमा केल्यावर २१ वर्षांच्या कालावधीत जवळपास ५० लाख रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. यामध्ये यामध्ये मोठा हिस्सा व्याजाचाच असतो.

तसेच, जर एखादा गुंतवणूकदार दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवत असेल, तर सध्याच्या व्याजदरानुसार मॅच्युरिटीच्या वेळी ७१ लाख रुपयांपर्यंत निधी मिळू शकतो. पण भविष्यात सरकारकडून व्याजदरात बदल झाल्यावर शेवटी रकमेतही बदल होऊ शकतो.

सुकन्या समृद्धी योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे टॅक्सची सवलत. जुन्या करप्रणालीअंतर्गत आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळते. तसेच या योजनेतून मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीची रक्कमही टॅक्स फ्री असते. त्यामुळे मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी मोठा निधी तयार करण्यासाठी ही योजना आजही सर्वात विश्वासू आणि फायदेशीर पर्याय मानली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lock Upp 2: 'लॉक अप २'मधून सुनीता आहुजाची एक्झिट; पत्नीला घेण्यासाठी सेटवर पोहोचला गोविंदा

Shocking : रेशनकार्ड बनवून देतो पण..., तहसीलदार ऑफिसजवळ बोलावून ३० वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी

Skin Care Tips : हे पदार्थ खाल्ल्याने ७ दिवसातच चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

वारी म्हणजे काय? महाराष्ट्रात वारी कधीपासून सुरू झाली?| Pandharpur Wari 2026

Kidney Health: किडनी अटॅकचा धोका टाळायचाय? लगेचच आहारात घ्या या ७ गोष्टींचा समावेश

SCROLL FOR NEXT