Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: जिद्द! काम करता करता केला अभ्यास; तीनदा अपयश; चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; IFS पूज्य प्रियदर्शिनी यांचा प्रवास

Success Story of IFS Pujya Priyadarshini: आयएफएस पुज्य प्रियदर्शिनी यांनी यूपीएससी परीक्षेत ११वी रँक प्राप्त केली. त्यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

अपयश ही यशाची पहिली पायरी

अपयश पचवून क्रॅक केली UPSC

आयएफएस पुज्या प्रियदर्शनी यांनी मिळवली ११वी रँक

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. अपयश हे पचवता यायला हवं. जर अपयश पचवता आलं तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकता. असंच काहीसं आयएफएस पूज्य प्रियदर्शिनी यांनी केलं. अनेक प्रयत्नांनंतर त्यांना यश मिळालं. त्यांच्या हा प्रवास सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी होती.

काम करुन केला अभ्यास

पूज्य प्रियदर्शिनी यांनी २०१३ मध्ये ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यूपीएससी परीक्षा देताना त्यांना यश मिळाले नाही. परंतु यामुळे त्या खचल्या नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी अभ्यास करता करता कामदेखील केले. दिल्लीतून बी.कॉम केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यांनी २०१३ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी ५ वर्ष खूप मनापासून अभ्यास केला. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना यश मिळाले.

UPSC परीक्षेत ११वी रँक

आयएफएस पूज्य प्रियदर्शिनी यांच्याही आयुष्यात कठीण काळ आला होता. २०१७ मध्ये त्यांनी प्रिलियम्स परीक्षादेखील पास केली नव्हती. यावेळी त्यांचा आत्मविश्वास डमगमला होता. परंतु त्यामुळे काही फरक पडला नाही. त्यांनी पुन्हा एकदा मन लावून अभ्यास केला. त्यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना ऑल इंडिया रँक ११ मिळाली. पूज्या प्रियदर्शिनी यांना चांगली रँक मिळाली होती. तरीही त्यांनी आयएएस सोडून आयएफएस अधिकारी होण्याचे ठरवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT