Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: नोकरी करत UPSC ची तयारी, ५ वेळा फेल पण हर मानली नाही, IAS झालीच; राम्या यांच्या यशाची कहाणी वाचाच!

IAS Ramya Success Story: आयुष्यात कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती प्रयत्न करतो तोच आयुष्यात यशस्वी होतो. असंच यश आयएएस राम्या यांनी मिळवलं आहे.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी खूप मेहनत आणि अभ्यास करावा लागतो. परंतु अनेकदा आपल्याला यश मिळत नाही. यूपीएससी परीक्षा द्यायची म्हटल्यावर अपयशाची तयारी पहिली करावी लागते. परंतु याच अपयशाला न घाबरता तुम्ही जर सातत्याने प्रयत्न केले तर तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होता. असंच यश राम्या यांनी मिळवलं. (IAS Ramya Success Story)

राम्या यांनी यूपीएससी परीक्षेत ४६ रँक मिळवून आयएएस ऑफिसर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.राम्या यांना लहानपणापासूनच सरकारी अधिकारी व्हायचं होतं. त्यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर नोकरी करुन स्वतः च्या पायावर उभं राहायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी १० वीनंतर पॉलिटेक्निकल डिप्लोमासाठी अॅडमिशन घेतलं. या काळात त्यांच्या एका शिक्षकाने त्यांना मोलाचा सल्ला दिला. शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे खूप सोपे आहे परंतु त्यानंतरही शिक्षण करणे खूप अवघड आहे, असं त्यांनी सांगितलं. या वाक्याचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव पडला.

त्यांनी डिप्लोमानंतर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कोइम्बतूर येथे अॅडमिशन गेतले. त्यानंतर त्यांना नोकरी मिळाली. नोकरीसोबतच त्यांनी एमबीए केलं. नोकरी करत असताना त्यांना समाधान मिळत नव्हतं. त्यामुळे त्यांनी २०१७ साली नोकरी सोडून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. (IAS Ramya Success Story)

या काळातदेखील त्यांनी खूप कष्ट घेतले. परंतु त्यांना अनेकदा अपयश आले. त्यांना पाच वेळा प्रिलियम्समध्ये अपयश मिळाले. या काळात त्यांनी परीक्षेची तयारी करत असताना डेटा एन्ट्रीची नोकरीदेखील केली. त्यांनी हार मानली नाही. त्यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक . आज त्या आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. (success Story)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP News : फडणवीसांचा वरचष्मा : भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Nanded Lok Sabha : नांदेड लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Rohit Sharma: रोहितला संघात घेण्यासाठी मुंबईने किती रक्कम मोजली होती?

तामिळ भाषेत चहाला काय म्हटलं जातं? फारच वेगळं आहे नाव!

World : जगात 'या' देशात आहे फक्त एक हॉस्पिटल

SCROLL FOR NEXT