Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: आईला गंभीर आजार; सलग ५ वेळा अपयश; ६ व्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS प्रियंका गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IAS Priyanka Goel: सलग पाचवेळा अपयश येऊनही प्रियंका गोयल यांनी सतत प्रयत्न केले. त्यांनी सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली अन् आयएएस ऑफिसर झाल्या.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस ऑफिसर होण्याची सर्वांची इच्छा असते. असंच स्वप्न प्रियंका गोयल यांनीदेखील पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. दिल्लीच्या प्रियंका यांना या प्रवासात अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, त्या कधीच डगमगल्या नाही त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. (Success Story)

प्रियंका गोयल या दिल्लीच्या रहिवासी. त्यांनी पीतमपुरा येथूल अग्रसेन मॉडल स्कूलमधून १२वी पर्यंतचे शिक्षण केले. त्यानंतर दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी प्राप्त केली. त्यानंतर यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी नोकरी करण्यासाठी परीक्षा दिली.

प्रियंका गोयल यांनी ६ वेळा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांना यूपीएससी परीक्षेत ५ वेळा अपयश आले.परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाही. प्रियंका यांचा हा प्रवास खूप खडतर होता.यूपीएससी परीक्षेची तयारी करताना प्रियंका गोयल यांना अभ्यासक्रमाची माहिती नव्हती. त्यामुळेच त्यांना पहिल्यांदा अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात ०.७ गुणांनी त्यांना अपयश आले. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात त्यांना अपयश आले. (Success Story Of IAS Priyanka Goel)

प्रियंका गोयल यांनी कोविडच्या काळात ५ वा प्रयत्न केला. परंतु याच काळात त्यांच्या आईचे ८० टक्के लंग्ज डॅमेज झाले होते. त्यामुळे ते प्रीलियम्स क्लिअर करु शकले नाही.प्रियंका यांनी या काळातही प्रयत्न नाही सोडले. त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केले. त्यानंतर ६ व्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT