Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ९ तासांची शिफ्ट, कॅबमध्ये अभ्यास, २३ लाखांच्या पगाराची नोकरी सोडली, पाचव्या प्रयत्नात IAS; काजल जावला यांचा प्रवास

Success Story IAS Kajal Jawla: आयएएस काजल जावला यांनी पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी लग्नानंतर परीक्षा दिली. यूपीएससी परीक्षेसाठी त्यांनी २३ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली.

Siddhi Hande

IAS काजल जावला यांचा प्रवास

सलग चौथ्या प्रयत्नात यूपीएससी केली क्रॅक

नोकरी करताना केली यूपीएससी क्रॅक

आयएएस किंवा आयपीएस ऑफिसर होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे.ही परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. यासाठी मेहनत, सातत्य हाच एक मार्ग आहे. असंच काहीसं मेरठच्या काजल जावला यांनी केलं. त्यांनी आपल्या अपयशाला जास्त मोठं होऊन दिलं नाही. प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही,हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

आयएएस काजल जावला या यूपीएससी परीक्षेत ४ वेळा अपयशी ठरल्या तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले. त्यांनी नोकरी करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे.

काजल जावला या ९ तासांची शिफ्ट करायच्या. यामध्येही त्यांनी अभ्यास केला. त्या ऑफिसला जाताना येता-जाताना कॅबमध्ये अभ्यास करायच्या. त्यांनी ५ व्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा दिली आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी २३ लाख रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली. त्यांनी खूप मेहनतीने यश मिळवलं आहे.

काजल या मूळच्या उत्तर प्रदेशच्या मेरठच्या रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण तिथूनच पूर्ण केले. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. परंतु त्यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यांनी २०१० मध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मथुरा येथून शिक्षण घेतले.

काजल यांनी बीटेक केल्यानंतर त्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली. परंतु त्यांच्य वडिलांना वाटत होते की, मुलगी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावी. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी २०१४ मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

नोकरी करता करता त्यांचे लग्न झाले होते. त्यांनी यूपीएससी परीक्षेची सुरु केली. ९ तासांची नोकरी करायचे. यासाठी ते दिल्लीतून गुरुग्राम येथे जात होते. यासाठी २ तास लागायचे. या कालावधीत त्या कॅबमध्ये बसून अभ्यास करायच्या.

काजल यांनी २०१२ मध्ये पहिल्यांचा यूपीएससी परीक्षा दिली. त्यावेळी त्यांना अपयश मिळाले. त्यांनी २०१४ मध्ये पुन्हा प्रयत्न केले. यातही त्यांना अपयश मिळाले. २०१६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळीही अपयश मिळाले. परंतु या अपयशामुळे त्या थांबल्या नाहीत. त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यातही त्या नापास झाल्या. त्यानंतर २०१८ मध्ये ५ व्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना नोकरीचाही चांगला अनुभव होता. २३ लाखांच्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT