Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: अमेरिकेतील नोकरी सोडली, वेफर्सच्या पाकिटापासून बनवल्या बॅग, पुण्याची लेक झाली कोट्यवधींची मालकीण

Success Story Of Business Women Amita Deshpande: पुण्याच्या अमिता देशपांडे यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे प्लास्टिकपासून बॅग, हँडबॅग बनवल्या आहेत.

Siddhi Hande

सध्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे यामुळे आपण अनेक गोष्टी ज्या फेकून देणार असतो त्याचा सदुपयोग करतो.याच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या व्यवसायातून तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवू शकतात. पुण्याच्या अमिता देशपांडे यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांना त्यांचा इको-सोशल ब्रँड रिचरखा (reCharkha) सुरु केला आहे.

१ लाखांची गुंतवणूक करुन सुरु केला व्यवसाय

अमिता यांनी केवळ १ लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरु केला आहे. त्या आता कोट्यवधी रुपये कमावतात. त्यांनी प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बॅग, पर्स अशा गोष्टी बनवल्या आहेत.

इको फ्रेंडली ब्रँड

अमिता यांनी पर्यावरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ब्रँड सुरु केला आहे. यामध्ये त्यांना चांगला नफा मिळत आहे. वेफर्सचे पाकीट किंवा अजून काही प्लास्टिकच्या पिशव्यांपासून या बॅग किंवा पर्स बनवल्या जाता. याचसोबत त्यांच्या या व्यवसायामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळतो.

अमेरिकेतील नोकरी सोडली

अमिता या IT इंजिनियर होत्या. त्या अमेरिकेत चांगल्या पगाराची नोकरी करत होत्या. अमेरिकेतली नोकरी सोडून त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्लास्टिकचा परत कसा वापर करता येईल याचा विचार केला आणि त्यादृष्टीने काम सुरु केले.

अमिता देशपांडे या २०१३ साली अमेरिका सोडून पुन्हा भारतात परतल्या. त्यांचे स्वप्न होते की पर्यावरणासाठी काहीतरी करावे. त्यामुळे २०१५ मध्ये नवऱ्यासोबत द इकोसोशल ट्राइब प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरु केली. त्यानंतर १ रिचरखा ब्रँड सुरु केला आहे. यात त्यांनी बॅग, पोटली बॅग, लंच बॅग, लाँड्री बँग अशा सर्व वस्तू बनवायला सुरुवात केल्या. फक्त १५ ते १०० प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर करुन ही बॅग बनवली जाते. त्यांचे मुंबई आणि पुण्यात दोन स्टोअर आहेत.

कोट्यवधींचा टर्नओव्हर

अमिता देशपांडे यांच्या प्रोडक्ट्सची किंमत ५५० ते ३,८०० रुपये आहे. त्यांच्या या व्यवसायाचा टर्नओव्हर २ कोटी रुपये आहे. त्यांच्यासोबत ६१ लोक काम करतात. त्यातील ५५ कारिगर आहेत. त्यांचा पहिला कारखाना दादरा हवेली नगर येथे सिलवासापासून २० किमी अंतरावर आहे. तर दुसरा कारखाना पुण्यापासून ६० किमी दूर भोर तालुक्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT