Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; दुसऱ्या प्रयत्नात IPS; सृष्टी मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IPS Srishti Mishra: सृष्टी मिश्रा यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा आपल्याला स्पर्धा परीक्षा देताना अपयशाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कितीही अपयश आले तरीही हार मानायची नाही. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करायची. असंच स्वप्न सृष्टी मिश्रा यांच्या वडिलांनी पाहिलं. सृष्टी यांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

सृष्टी मिश्रा यांनी दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी २०२३ यूपीएससी सीएसईमध्ये ९५ रँक प्राप्त केली.

आयपीएस सृष्टी मिश्रा या मूळच्या उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी. त्यांचे वडिल विदेश मंत्रालयात अंडर सेक्रेटरी आहेत. तर आई गृहिणी आहे. सृष्टी यांनी आयएएस व्हावं, हे त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते.

सृष्टी यांनी दिल्लीतील श्रीराम लेडी कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकोनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यानंतर फरीदाबाद येथे मावशीसोबत राहून यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

रोज ८-८ तास अभ्यास

सृष्टी यांना पहिल्या प्रयत्नात अपयश मिळाले. त्यांनी प्रिलियम्स परीक्षादेखील पास केली नव्हती. परंतु यामुळे त्या निराश झाल्या नाहीत. याचसोबत त्यांनी आपल्या चुकांमधून शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रोज ८-१० तास अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा देऊन त्या आयपीएस अधिकारी झाल्या.

मिडिया रिपोर्टनुसार, सृष्टी या परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा भारतात परतल्या. त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांचा हा प्रवास लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT