Stock Market
Stock Market Yandex
बिझनेस

Share Market : शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स ७३ हजार पार, निप्टीही तेजीवर स्वार

Vishal Gangurde

मुंबई : आज गुरुवारी शेअर बाजार सुरु झाल्यावर मोठी तेजी पाहायला मिळत आहे. काल रामनवमीच्या औचित्यावर शेअर बाजार बंद होतं. एक दिवसानंतर आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे. शेअर बाजार सुरु झाल्यानंतर आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निप्टी तेजीवर स्वार आहेत.

आज आयटी शेअरमध्ये ०.८८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले, मात्र काही मिनिटानंतर घसरण पाहायला मिळाली. मिडकॅपमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तर बँकिंग शेअरमध्येही उसळी पाहायला मिळत आहे.

शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स २३९.४२ अंकानी उसळी घेतली आहे. आज सकाळी सेन्सेक्स ०.३३ टक्क्यांनी वाढून ७३,१८३ अंकावर सुरु झाला. तर एनएसई निप्टी ६४.४५ अंक म्हणजे ०.२९ टक्क्यांनी वाढून २२,२१२ अंकावर सुरु झाला.

बीएसई सेन्सेक्सच्या ३० पैकी २२ शेअरने उसळी घेतली आहे. तर ८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

बीएसई सेन्सेक्सच्या ३० पैकी २२ शेअरने उसळी घेतली आहे. तर ८ शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्सचे टॉप गेनर्समध्ये पॉवरग्रिड, एमएंडएम, इन्फोसिस, टीसीएस, एलएनडटी, विप्रोचे चांगले ट्रेड करत आहे. तर एचसीएल टेक, नेस्ले, एनपीसी, अॅक्सिस बँक आणि टेक महिंद्राचे शेअर घसरण पाहायला मिळाली.

निफ्टी ५०च्या ३६ शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाळी. एचडीएफसी लाइफ, बीपीसीएल, अदानी पोर्ट्स, पॉवरग्रीड, हिंडाल्को या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. एचसीएल टेल अपोलो हॉस्पिटल, एनटीपीसी, टेक महिंद्रा आणि नेस्लेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

Mumbai News: विमानाच्या धडकेत ३० पेक्षा जास्त फ्लेमिंगोचा मृत्यू, मुंबईतल्या घाटकोपरमधील घटना

SCROLL FOR NEXT