Sensex Saam Tv
बिझनेस

Sensex: ३ तासातच गुंतवणूकदारांचे १.७७ कोटी बुडाले, सेनसेक्समध्ये ७०० अंकाची घसरण

Sensex And Nifty Rates Today : शेअर मार्केटमध्ये रोज बदल होताना दिसतात. सेनसेक्समध्ये आज सातत्याने चढउतार होताना दिसत असून सकाळी ११ वाजता सेनसेक्स ७०० अंकानी घसरला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sensex Rate Today 25th January 2024:

शेअर मार्केटमध्ये रोज बदल होताना दिसतात. सेनसेक्समध्ये आज सातत्याने चढउतार होताना दिसत असून सकाळी ११ वाजता सेनसेक्स ७०० अंकानी घसरला होता. सेनसेक्स ७०५.३३७ वरून घसरून ७०,३३७ वर स्थिर झाला होता. तर निफ्टी १९४.२५ अंकावर म्हणजेच -०.९१ % अंकावरुन घसरून २१,२५९ अंकाची निचांकी पातळी गाठली. BSE च्या शेअर्सचे मार्केट कॅप ३,७१,१८,५००.६२ कोटी रुपये होते. सेनसेक्स आणि निफ्टीचे दर घसरल्यामुळे आज तीन तासात गुंतवणूकदारांचे तब्बल १.७७ कोटींचे नुकसान झाले आहे. (Latest News)

सकाळी १०.१५ वाजता सेनसेक्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत होती. सेनसेक्स जवळपास ६०० अंकानी घसरता होता. सेनसेक्स ७०,५४५.४९ अंकावर स्थिर झाला. सकाळी ९.५८ वाजता शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळाली. सेनसेक्स ३०२.६८ अंकानी म्हणजेच ०.४३% घसरून २१,३७१.९५ वर स्थिरावला होता.

आज दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. सेनसेक्स ३८.२१ म्हणजेच ०.०५% घसरला आहे. सेनसेक्स ७१,०२२.१० वर उघडला होता. तर निफ्टी ३१.६० अंकांनी म्हणजेच ०.१५% घसरण झाली होती. निफ्टी २१,४२२ वर उघडला होता. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.

सेनसेक्स कंपन्यांमध्ये टेक महिंद्राचे शेअर्स चार टक्क्यांनी घसरले आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, विप्रो, अॅक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हेसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचेही शेअर्स घसरले होते. तर इंडसइंड बँक, एनटीपी, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स सर्वाधिक वाढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Maharashtra Live News Update: नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू

JioPC: टीव्हीला संगणक बनवा JioPC च्या किफायतशीर प्लॅनसह, फक्त ५९९ रुपयांत

Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनला लाडकीला ओवाळणी मिळणार! २९८४ कोटींचा निधी वर्ग, खात्यात ₹३००० खटाखट येणार?

अर्धा लिंबू, कुंकू अन् टाचण्या.. अजित पवार गटातील नेत्याच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT