Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीद्वारे मिळालेल्या पैशांमधून सुरु करा 'हा' बिझनेस; 5 हजारांच्या गुंतवणूकीतून कमवाल लाखो रूपये

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेतून मिळालेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर महिलांना अधिक पैसे मिळू शकतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला एक बिझनेसची माहिती देणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्रात लाडकी बहिण योजना सुरु झाली आहे. यामध्ये सक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देणार आहेत. या माध्यमातून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती आहे. या योजनेतून मिळालेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर महिलांना अधिक पैसे मिळू शकतात.

यासाठी आज आम्ही तुम्हाला एक बिझनेसची माहिती देणार आहोत. ज्या बिझनेसमध्ये हे पैसे गुंतवून तुम्ही मालामाल होऊ शकता.आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नाही. यावेळी तुम्ही फक्त 5,000 रुपयांमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. याद्वारे तुम्ही चांगला नफा मिळवू शकतो आणि केवळ 1 वर्ष किंवा 6 महिन्यांत लाखो रुपये कमवू शकतो.

आम्ही मेणबत्तीच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. मेणबत्तीचा व्यवसाय असा आहे की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने उपयोगी पडतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आम्हाला मेणाची आवश्यकता असणार आहे. कच्चा मेण आणून मग मोल्ड वापरून आगीत वितळवून आपण मेणबत्त्या तयार करू शकतो.

कसा कराल मेणबत्तीचा बिझनेस?

यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार रंगीत मेणबत्त्या किंवा साध्या मेणबत्त्या तयार करू शकता. 1 किलो मेणापासून जवळपास 20 ते 25 मेणबत्त्यांची पाकिटं तयार केली जाऊ शकतात. या मेणबत्त्या दररोज 500 ते 1000 रुपयांना विकून महिन्याभरात चांगलै पैसे कमावू शकता. या कामातून लाखो रुपये मिळू शकतात.

महिलांसाठी योग्य आहे हा बिझनेस

हा एक असा व्यवसाय आहे की, त्याची नेहमीच गरज भासते. मुळात मेणबत्त्या ही एक वस्तू आहे जी सतत विकली जाते. त्यामुळे महिला या गोष्टी सहजरित्या तयार करू शकतात. यामध्ये मेण वितळवून तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते मोल्ड करू शकता. याचा आम्हाला काम करताना खूप फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

SCROLL FOR NEXT