Ladki Bahin Yojana Update canva
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी खास बिझनेस आयडिया; योजनेतून मिळालेल्या पैशांनी सुरु करा तुमचा व्यवसाय

Ladki Bahin Yojana: काही व्यवसाय असे आहेत की, ते सुरू करण्यासाठी तुम्हाला दुकानाचीही गरज नाही आणि जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. यासाठी तुम्ही 5 हजार रुपये गुंतवून दरमहा 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्हीही मुख्यमंत्र्‍याच्या लाडक्या बहिणीचा लाभ घेता का? या योजनेतून मिळालेल्या पैशांचं तुम्ही काय करता? जर तुम्हाला या माध्यमातून देखील पैसे कमावयचे असतील तर आम्ही तुम्हाला एक आयडिया देणार आहोत. यामध्ये आम्ही तुम्हाला एक बिझनेस सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकणार आहात.

या बिझनेसमध्ये तुम्ही दिवसातून फक्त 3 तास काम करून तुम्ही महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमवू शकता. यापैकी काही व्यवसाय असे आहेत की, ते सुरू करण्यासाठी तुम्हाला दुकानाचीही गरज नाही आणि जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. यासाठी तुम्ही 5 हजार रुपये गुंतवून दरमहा 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.

स्प्राउट्सचा बिझनेस करा सुरु

सध्या लोकं त्यांच्या हेल्थबाबत खूप जागरूक झालेत. अशा अनेक गोष्टी खाण्या-पिण्यात वापरल्या जातात ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये लोक दिवसा स्प्राउट्स खातात. स्प्राउट्स आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हाच विचार करून तुम्ही हा बिझनेस सुरु करू शकता.

५ हजारांची करू शकता गुंतवणूक

हा व्यवसाय सुरू करण्याचा सर्वात चांगला फायदा म्हणजे त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही. तुम्ही 5,000 रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह हा बिझनेस सुरू करू शकता. या बिझनेससाठी तुम्हाला मोठ्या जागेची गरज नाही. तुम्ही हे 4×2 टेबलने देखील याची सुरुवात करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असेल:

  • हरभरा

  • मूग

  • कॉर्न

  • काकडी

  • कांदा

  • टोमॅटो

कसा सुरु कराल बिझनेस?

स्प्राउट्स बनवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जात असला तरी, तुम्ही वर नमूद केलेल्या गोष्टींपासून या बिझनेसची सुरुवात करू शकता. याची रेसिपी तुम्ही YouTube देखील वापरू शकता. तुम्हाला यासाठी सकाळी 6 ते 9 पुरेसा वेळ आहे. या काळात दुकानेही बंद असतात. त्यामुळे कोणत्याही दुकानासमोर स्टॉल लावून तुम्ही याची विक्री करू शकता.

कशी होईल कमाई?

स्प्राउट्सची एक प्लेट साधारणपणे 20 रुपयांना विकली जाते. समजा तुम्ही सकाळी 6 ते 9 या वेळेत 100 प्लेट्स विकल्या तर तुमची रोजची कमाई 2000 रुपये होईल. यानुसार तुम्हाला दरमहा 60 हजार रुपये मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

SCROLL FOR NEXT