Silver Rate Today saam tv
बिझनेस

Silver Rate Today: चांदी तब्बल ₹२.२३ लाखांनी स्वस्त! मग धनत्रयोदशीला चांदी खरेदी करायची? तज्ज्ञ काय सांगतात?

Dhanteras 2026 : धनत्रयोदशीआधी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आता चांदी खरेदी करावी की आणखी दर घसण्याची वाट पाहावी? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Sakshi Sunil Jadhav

Silver Rate Today: सणासुदीच्या काळात सोनं-चांदी खरेदी केली जाते. सोनं-चांदी खरेदी करताना मुहूर्त पाहिला जातो. पण गेल्या काही दिवसात याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळतोय. आनंदाची बाब म्हणजे आता सोन्याच्या किंमतीत वाढ झालीये, त्यामुळे ग्राहक चांदीत गुंतवणूक करणं पसंत करतायेत. चांदी विक्रमी उच्चांकावरून प्रति किलो सुमारे २.२३ लाख रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे यंदा धनत्रयोदशीला चांदी खरेदी करावी की याचे दर कमी होण्याची वाट पाहावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, दरात मोठी घसरण झाली म्हणजे चांदी आता स्वस्तच राहील, असं नाही.

चांदीचे दर किती घसरले?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, MCX वर सोमवारी चांदीचा भाव प्रति किलो १,९६,२५७ रुपयांवर होता. सुरुवातीच्या व्यवहारामध्ये तो १,९७,१८६ रुपयांपर्यंत पोहोचला, त्यानंतर नफावसुलीमुळे दरात पुन्हा घसरण झाली. सराफा बाजारात चांदीचा दर १,९५,०५० रुपये प्रति किलो नोंदवण्यात आला.

चांदीचा विक्रमी उच्चांक ४,२०,०४८ रुपये प्रति किलो होता. त्या तुलनेत किंमतीत २.२३ लाख रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीचा भाव जानेवारी २०२६ मधले सुमारे ११७ डॉलर प्रति औंस या उच्चांकावरून ५४ डॉलरच्या आसपास घसल्याचं दिलेल्या माहितीत नमूद आहे.

चांदीच्या दरात घसरण का झाली?

१. नफावसुली: विक्रमी दरानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याने भावावर दबाव आला.

२. अमेरिकेतील व्याजदर: फेडरल रिझर्व्हच्या धोरणांबाबतची अनिश्चितता मौल्यवान धातूंच्या किमतींवर परिणाम करू शकते.

३. डॉलर आणि बॉण्ड यील्ड: डॉलरमधील चढ-उतार आणि बॉण्ड यील्डमधील बदल चांदीच्या दरावर प्रभाव टाकतात.

४. औद्योगिक मागणी: सौरऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर उद्योगांतील मागणी कमी होण्याची चिंता दरांवर परिणाम करू शकते.

धनत्रयोदशीला चांदी खरेदी करावी का?

कमोडिटी तज्ज्ञ अजय केडिया यांच्या मते, चांदीच्या दरातील अस्थिरता आणखी काही काळ कायम राहू शकते. त्यामुळे केवळ दर घसरले आहेत म्हणून एकाच वेळी मोठी गुंतवणूक करणे टाळावे. दर स्थिर होण्याची चिन्हे दिसल्यानंतर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा विचार करता येऊ शकतो. सिल्व्हर ETF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी पोर्टफोलिओतील चांदीचा वाटा, ETF ची बाजारातील किंमत, iNAV आणि व्यवहारातील तरलता तपासावी. तसेच, केवळ खरेदीची सरासरी किंमत कमी करण्यासाठी वारंवार गुंतवणूक करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या; संशयित आरोपी अटकेत

Pradeep Purnekar Case: 5वा आरोपी राजेंद्र शिंदेच; २६ दिवसांनंतर पूर्णेकर हत्या प्रकरणात नवी अपडेट; हॉटेलमधला CCTV व्हिडिओ आला समोर

Cordelia Sky: कॉर्डेलियाची नवी क्रूझ सुरू! स्विमिंग पूल, जकूझी आणि मनोरंजनासह मिळणार अनेक सुविधा

Private Part Hair Removal: महिलांनो, प्रायव्हेट पार्ट्सचे केस काढताना करू नका 'या' चुका; लक्षात ठेवा ७ गोष्टी

Antibiotic Side Effects : अँटिबायोटिक्स घेतल्यावर पचनक्रिया का बदलते? 'या' महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT