Silver Rate Prediction Saam Tv
बिझनेस

Silver Rate Prediction: सोन्यापेक्षा चांदीनं केलं मालामाल! १० महिन्यात ₹९०,००० वाढ, आता खरेदी करणे योग्य का?

Silver Rate Prediction 2025 : सोन्यापाठोपाठ चांदीचेही दर गगनाला भिडले आहे. चांदीचे दर मागील १० महिन्यात दुप्पट झाले आहेत. चांदीचे दर वाढण्यामागची कारणे वाचा.

Siddhi Hande

सोन्यापाठोपाठ चांदीचे दर वाढले

मागील दहा महिन्यात चांदीचे दर दुप्पट

चांदीचे दर वाढण्यामागची कारणे

सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्यापाठोपाठ आता चांदीचेही दर वाढले आहे. चांदीचे दर मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहेत. चांदीच्या दरात मागील १० महिन्यात ९०,००० ते १ लाख रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरातील गुंतवणूक आता फायदेशीर ठरत असल्याचे दिसत आहे.

चांदीचे दर लाखो रुपयांनी वाढले

चांदीच्या दर मागील १० महिन्यात दुप्पट झाले आहे. मागच्या वर्षी चांदी जवळपास प्रति किलो १ लाखांच्या घरात होती. यावर्षी चांदीचे दर प्रति किलो १,९०,००० रुपये झाले आहे. तर चेन्नईत हे दर २ लाख ७ हजार रुपये झाले आहेत. चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे तुम्हाला सर्वाधिक रिटर्न मिळत आहेत. दरम्यान, चांदीचे दर एवढे का वाढले यामागे काही कारणे आहेत.

चांदीचे दर वाढण्याची कारणे (Silver Rate Hike Reasons)

चांदीचे दर वाढण्याची तीन मुख्य कारणे आहेत. सणासुदीच्या काळात मागणी वाढते. वाढती औद्योगिक मागणी आणि त्या तुलनेने कमी पुरवठा. या कारणांमुळे चांदीचे दर वाढत आहेत.

वाढती मागणी

भारतात सर्वाधिक चांदी खरेदी केली जाते. सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी केलेले शुभ मानले जाते. त्यामुळे चांदीची मागणी वाढते. अनेकजण चांदीच्या अंगठ्या, ब्रेसलेट बनवतात. यामुळे चांदीचे दर वाढत आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी

सौरऊर्जा प्रकल्पांमध्ये चांदीचा वापर केला जातो. एआय उद्योग, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रिक वस्तू, वायर यामध्ये चांदीचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक उद्योगात चांदी खरेदी केली जाते. त्यामुळे चांदीच्या दरात वाढ होत आहे.

कमी पुरवठा

चांदीची मागणी वाढत आहे आणि त्या तुलनेने पुरवठा कमी आहे. काही देशांमध्ये पर्यावरणातील बदलांमुळे अनेक खाणी बंद झाल्या आहेत आणि खाणकाम कमी करण्यात आले आहे. त्यामुळेदेखील चांदीची मागणी वाढत आहे आणि पुरवठा कमी होत आहे.

आता चांदी खरेदी करणे योग्य आहे का? (Why Silver Rate Increases)

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, चांदीचे दर सध्या विक्रमी उंचीवर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खरेदी टाळली पाहिजे. येत्या काळात चांदीचे दर अजून वाढू शकतात. त्यामुळे नवीन खरेदी थांबवली पाहिजे. येत्या काळात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात जास्त वाढ होऊ शकते, असंही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT