Share Market Today Saam Tv
बिझनेस

Share Market Opening: शेअर बाजार उघडताच सेनसेक्स अन् निफ्टीने गाठला उच्चांक; कोणते शेअर फायद्यात?जाणून घ्या

Share Market Today 22nd August 2024: आज सकाळी शेअर मार्केट उघडताच सेनसेक्सने उच्चांक गाठला आहे. सेनसेक्स जवळपास ८१००० अंकाच्या जवळपास व्यव्हार करत आहे.

Siddhi Hande

रोज सकाळी सर्व गुंतवणूकदारांचे शेअर मार्केटकडे लक्ष असते. आज सकाळी ९.३० वाजता शेअर मार्केट सुरु होताच अनेक कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी पाहायला मिळाली. आज शेअर मार्केटची सुरुवात सेनसेक्स आणि निफ्टीमधील वाढीने सुरु झाली आहे.

२२ ऑगस्टला शेअर मार्केट सुरु होताच बीएसई सेनसेक्स १८७.३० अंकांच्या वाढीसह म्हणजेच ०.२३ टक्क्यांनी वाढला आहे. सेनसेक्स आज सकाळी ८१,०९२ अंकासह उघडला. बुधवारी सेनसेक्स ८०,९०५ पातळीवर बंद झाला होता. त्यामुळे आज सेनसेक्स तेजीत सुरु झाला आहे. तर NSE निफ्टी ६१.९५ अंकासह ०.२५ टक्क्यांच्या वाढीसह सुरु झाला आहे. सध्या निफ्टी २४,८३२.१५ वर उघडला आहे.

आज सकाळी शेकर मार्केट उघडताच पेटीएमचे शेअर्स ३.७२ टक्क्यांच्या वाढीसह व्यव्हार करत आहे. तर झॉमेटोचे शेअर्स २६०.७१ रुपयांवर व्यव्हार करत आहे.आज बँक निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

आज सकाळी शेअर मार्केट उघडताच BSE सेनसेक्स हिरव्या म्हणजेच वाढीसह व्यव्हार करत आहे. ३० पैकी २४ विभागांमध्ये वाढ होत आहे. आज एचडीएफसी लाइफने या वर्षातील उच्चांक गाठला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये किंचित वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT