bank holiday every Saturday fact check 
बिझनेस

Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

Are banks closed every Saturday : सर्व सरकारी बँका दर शनिवारी बंद राहणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल आहे. मात्र केंद्र सरकारने पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू केलेला नाही. दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा असून इतर शनिवारी बँका सुरू राहतात.

Namdeo Kumbhar

bank holiday every Saturday fact check : सरकारी बँका आता आठवड्यातून ५ दिवसच सुरू राहणार असून प्रत्येक शनिवारी सुट्टी असणार, अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पण केंद्र सरकारने असा कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही किंवा यासंदर्भात कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी बँकांसाठी जुनाच नियम लागू असून, दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता इतर शनिवारी बँका नियमितपणे सुरू राहतील.

व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये नेमकं काय?

३० सप्टेंबरपासून एसबीआयसह सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना प्रत्येक शनिवारी सुट्टी असेल, असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. या मेसेजसोबत अर्थ मंत्रालयाशी संबंधित एका बनावट अधिसूचनेचा फोटो जोडण्यात आला आहे. त्यात वित्तीय सेवा विभागाच्या SO 4275(E) क्रमांकाचा उल्लेख करत, विनिमय कायदा १८८१ च्या कलम २५ अन्वये प्रत्येक शनिवारी सुट्टी जाहीर केल्याचा दावा केला गेला आहे. परंतु, सरकारी नोंदींनुसार हा दावा पूर्णपणे बनावट आहे.

Bank Holiday Fact Check:

शासकीय निवेदनात काय म्हटले आहे?

२१ सप्टेंबर २०२६ रोजी अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पीआयबी (PIB) निवेदनानुसार, बँकांना फक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच सुट्टी असेल. इतर शनिवारी बँका नियमित सुरू राहतील.

दरम्यान, २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी अर्थ मंत्रालयाने रविवार, २७ सप्टेंबर रोजी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

पाच दिवसांच्या बँकिंगबाबत निर्णय झाला का?

आठवड्यातून ५ दिवसच काम आणि प्रत्येक शनिवारी सुट्टी, ही मागणी बँक संघटनांनी (UFBU) केली असून ती अजूनही प्रलंबित आहे. २८-३० सप्टेंबरचा संप टाळण्यासाठी आयबीए (IBA) आणि बँक संघटनांनी या मागणीवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, असा निर्णय अद्याप लागू झालेला नाही.

बँका कधी बंद आणि कधी सुरू असतात?

आरबीआयच्या २०१५ मधील नियमांनुसार, बँकांना केवळ दुसरा आणि चौथा शनिवार तसेच प्रत्येक रविवारी सुट्टी असते. महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँका नेहमीप्रमाणे सुरू असतात.

त्यामुळे ३ ऑक्टोबर (पहिला शनिवार) रोजी बँका बंद राहतील हा व्हायरल दावा पूर्णपणे खोटा असून, त्यादिवशी एसबीआयसह सर्व सरकारी बँका नियमित सुरू राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: पत्नीनं वडिलांच्या पैशांनी घेतलं घर, तिचा पती होऊ शकतो का मालक? हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दीपके आक्रमक

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

SCROLL FOR NEXT