Samsung  Saam Tv
बिझनेस

Tech News: सॅमसंग या वर्षात १०० दशलक्ष गॅलॅक्‍सी डिवाईसेसमध्‍ये गॅलॅक्‍सी एआय उपलब्‍ध करून देणार: टीएम रोह

Samsung : सॅमसंग १ बिलियनहून अधिक गॅलॅक्‍सी ग्राहकांसह मोबाइल उद्योगामधील अग्रणी कंपनी आहे. दशकांपासून ग्राहक अभिप्राय जाणून घेत, मोबाइल्‍सकरिता एआय सानुकूल करण्‍यासाठी वर्षानुवर्षे नाविन्‍यता आणत आहे. लँग्‍वेज एआयचे व्‍यवसायीकरण आणि मोबाइलसाठी एआयच्‍या ऑप्टिमायझेशनपासून फ्रेमवर्क विकासापर्यंत नोएडा व बेंगळुरूमधील केंद्रांनी मोठे योगदान दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सॅमसंगच्‍या प्रमुख स्‍मार्टफोन्‍सनी भारतात उत्तम कामगिरी केलीय. प्रिमिअम श्रेणीची दोन-अंकी वाढ दिसत आहे. भारतात गॅलॅक्‍सी एस २३ सिरीजची विक्री गॅलॅक्‍सी एस२२ सिरीजच्‍या तुलनेत १.४ पट होती. आता मोबाईल मॉडेलमध्ये नवीन फीचर अॅड केले जाणार आहेत. सॅमसंग गॅलॅक्‍सी एआयचे फीचर जोडण्यात येणार आहेत.(Latest News)

''या वर्षी गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजमध्‍ये एआयच्‍या क्षमतेचा भर करत उद्योगामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. मोबाइल फोन्‍स लोकांना एकत्र आणण्यासाठी निर्माण करण्‍यात आले आणि आपण आपल्‍या दैनंदिन जीवनात स्‍मार्टफोन्‍सचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आमचा विश्‍वास आहे की, लोक जवळपास प्रत्‍येक गोष्‍टीसाठी स्‍मार्टफोनचा वापर करत असल्‍यामुळे मोबाइल्‍स एआय तंत्रज्ञानासाठी प्रमुख अॅक्‍सेस पॉईंट बनतील. गॅलॅक्‍सी एस२४ सिरीजसह आमचा गॅलॅक्‍सी एआयच्‍या माध्‍यमातून युजर अनुभवामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यावर दृढ विश्‍वास आहे, असं टीएम रोह म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सॅमसंग १ बिलियनहून अधिक गॅलॅक्‍सी ग्राहकांसह मोबाइल उद्योगामधील अग्रणी कंपनी आहे. दशकांपासून ग्राहक अभिप्राय जाणून घेत, मोबाइल्‍सकरिता एआय सानुकूल करण्‍यासाठी वर्षानुवर्षे नाविन्‍यता आणत आहे. उद्योग प्रमुखांसोबत खुले सहयोग करत आम्‍ही गॅलॅक्‍सी एआय घेऊन आलो आहोत जे 'मोबाइल एआयसाठी जागतिक मानक' बनेल. गॅलॅक्‍सी एस२४ सिरीज ऑन-डिवाईस असो किंवा क्‍लाऊडमध्‍ये असो सर्वोत्तम फायद्यांसह अर्थपूर्ण युजर अनुभव प्रदान करण्‍यात येईल. पहिला एआय फोन गॅलॅक्‍सी एस२४ सह आम्‍ही एआय फोन्‍सच्‍या नवीन युगाचा शुभारंभ केल्याचे रोह म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT