Jalgaon News X
बिझनेस

जिद्दीला सलाम! रेल्वे स्थानकावर बेवारस सापडली, अनाथाश्रमात वाढली; दहावीत मिळवले ८९ टक्के

Jalgaon News : चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावर बेवारस सापडलेल्या विद्यार्थिनीने दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. तिने दहावीमध्ये ८९ टक्के मिळवून लढण्याची जिद्द दाखवून दिली आहे.

Yash Shirke

संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी

दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे खान्देशच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, अशात जळगाव बालनिरीक्षणगृहातील एका मुलीने ८९ टक्के गुण मिळवून आपण अनाथ असूनही बाजीगर असल्याचे स्वतःला सिद्ध केले आहे. चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर दहा वर्षांपूर्वी ही मुलगी बेवारस आढळून आली होती.

दहावीच्या ऑनलाइन निकालानंतर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुलांचे शिक्षक आणि पालकांकडून कौतुक सुरू आहे. यश मिळवलेल्या मुलांच्या कुटुंबामध्ये आनंद साजरा होत आहे. तर दुसरीकडे जळगावच्या बालनिरीक्षणगृहात अनाथ असलेल्या एका मुलीने चक्क ८९ टक्के गुण मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. या मुलीला आपले आई-वडील देखील आठवत नाहीत. दहावीतील यशानंतर तिने उच्च शिक्षणाची इच्छा व्यक्त केली आहे.

चाळीसगाव रेल्वेस्थानकावर साधारणपणे दहा वर्षांपूर्वी पूजा (नाव बदललेले) बेवारस स्थितीत मिळून आली. यानंतर सामाजिक संस्थेच्या मदतीने तिला बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. निरीक्षणगृहाच्या वतीने तिला शहरातील प्रतिभाताई माध्यमिक विद्यालयात प्रवेश देण्यात आला. पूजाने निरीक्षणगृहातील कर्मचारी आणि सोबत असलेल्या मुलींनाच आपले कुटुंब बनवून त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहणे सुरू केले.

पूजा अभ्यासात हुशार असल्यामुळे शाळेतदेखील तिची चुणूक दिसत होती. दहावीचा अभ्यास करण्यासाठी तिने स्वतः नियोजन केले. चांगला अभ्यास केला. अखेर या परीक्षेत शाळेतून पहिली येण्याचा मान मिळवला. ८९ टक्के मिळवून ती विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली आहे. पुढे तिचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचा मानस आहे. यासाठी निरीक्षणगृहाच्या माध्यमातून पुण्याच्या क्षमता संस्थेशी संपर्क करण्यात आला आहे. या संस्थेच्या मदतीने पूजाचे पुढील उच्च शिक्षण पूर्ण केले जाणार आहे. या निकालाबद्दल पूजाने आनंद व्यक्त केला असून, तिने भविष्यात उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT