Royal Enfield 250cc  Saam Tv
बिझनेस

Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक येतेय, 250cc इंजिनसह मिळणार जबरदस्त मायलेज

Royal Enfield आता भारतात सर्वात स्वस्त आणि लहान इंजिन बाईक घेऊन येत आहे. Autocar च्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या नवीन 250cc इंजिन बाईकवर काम करत आहे.

Satish Kengar

रॉयल एनफिल्डने हंटर 350 लॉन्च करून परवडणाऱ्या बाईक सेगमेंटमध्ये आधीच प्रवेश केला आहे. हंटर 350 येताच बाजारात हिट झाली. Royal Enfield आता भारतात सर्वात स्वस्त आणि लहान इंजिन बाईक घेऊन येत आहे. Autocar च्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या नवीन 250cc इंजिन बाईकवर काम करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयल एनफिल्डमध्ये नवीन 250 सीसी प्लॅटफॉर्मवर काम खूप दिवसांपासून सुरू आहे. कंपनी ही बाईक अतिशय किफायतशीर स्वरूपात आणू शकते. म्हणजेच हंटर 350 पेक्षा ही बाईक स्वस्त असू शकते. कंपनी नवीन बाईकच्या माध्यमातून तरुणांना टार्गेट करणार आहे.

250cc आणि V-प्लॅटफॉर्मवर आधारित या आगामी बाईकमध्ये अनेक नवीन फीचर्स मिळणार. हे नवीन मॉडेल पुढील वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होऊ शकते. बाईक कोणत्या नावाने येईल आणि तिची किंमत किती असेल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. याची किंमत 1.20 ते1.40 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.

इलेक्ट्रिक बाईकही होणार लॉन्च

Royal Enfield आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने नवीन मॉडेलच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले आहे. कंपनी ही बाईक वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी ऑटो एक्सपो 2025 मध्ये सादर करू शकते. रॉयल एनफिल्डच्या नवीन इलेक्ट्रिक बाइकमध्ये सिंगल सीट असेल, जी त्याच्या सेगमेंटमधील सर्वात आरामदायक सीट देखील असू शकते.

डिझाईनचे पेटंट पाहता, बॅटरी पॅकसाठीही हीच फ्रेम वापरली जाईल, असं बोललं जात आहे. यात बसवलेले मोटर युनिट दिसणार नाही, ज्यामुळे बाईकचा लूक चांगला दिसेल. ब्रेकिंगसाठी या बाईकमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि दोन्ही टायरमध्ये डिस्क ब्रेकची सुविधा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

SCROLL FOR NEXT