रेनॉल्ट ही वाहन उत्पादन कंपन्यांमधील नावाजलेली कंपनी आहे. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवनवीन कार लाँच करत असते. कंपनीने आपल्या काही कारमध्ये महत्त्वाचे अपडेट केले आहेत. या कार नवीन फीचर्स आणि रंगासह बाजारात खरेदी केल्या जाऊ शकतात. Renault च्या Kwid, Triber, Kiger या कार नवीन फिचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया या कारच्या फीचर्सबद्दल. (Latest News)
2024 Renault Kwid
Renault Kwid कारमध्ये काही बदल करण्यात आले आहे. ही कार रिअर सीट बेल्ट रिमाइंडर फीचर्ससह येतात. कारमध्ये १४ स्टँडर्ड फीचर्स देण्यात आले आहे. या कारच्या सर्व मॉडेल्स Apple CarPlay आणि Android कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह येतात. याशिवाय कारमध्ये ड्रायव्हर सीट आर्मरेस्ट, वायरलेस चार्जर, पीएम 2.5 एअर फिल्टर, 12 व्होल्ट पॉवर सोर्स, पॉवर्ड ORVM, एलईडी केबिन लॅम्प फीचर्स देण्यात आले आहेत.
कारच्या इंजिनमध्ये फार काही बदल करण्यात आला नाहीये. कारचे इंजिन 0.8 लिटर आणि 1.0 लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन पर्यायांमध्ये येऊ शकते. तसेच इंजिन मॅन्यिअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही पर्यायांमध्ये असेल.
Renault Triber 2024
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये १५ सेफ्टी फीचर्स जोडण्यात आले आहे. यात स्टार्ट असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅब्लिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, रिअर सीट बेल्ट रिमायंडर. ऑटोफोल्ड ORVM आणि क्रुझ कंट्रोल फीचर देण्यात आले आहे. या नवीन कारची किंमत ६ लाखांपासून ९ लाखापर्यंत आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहे.
2024 Renault Kiger
नवीन Renault Kiger दोन नवीन प्रकारात सादर करण्यात आली आहे. ही कार RXL AMT आणि RXT (O) टर्बो X-tronic CVT या दोन प्रकारात उपलब्ध आहे. कारमध्ये सीट बेल्ट, पॉवरफोल्ड ओआरव्हीएम, सेमी-लेदर सीट्स, ऑटो एसी, स्टीयरिंग व्हील कव्हर आणि क्रूझ कंट्रोल देखील आहेत. या कारच्या सर्व व्हेरियंटची किंमत जवळपास ६ लाख ते ११ लाखापर्यंत आहे.
कारची किंमत
2024 Renault Kwid RXE MT ची किंमत 4.69 लाख
2024 Renault Kwid RXL (O) MT ची किंमत 4.99 लाख रुपये
2024 Renault Kwid RXT MT ची किंमत 5.50 लाख
2024 Renault Kwid Climber MT ची किंमत 5.87 लाख रुपये
2024 Renault Kwid RXL (O) AMT ची किंमत 5.44 लाख रुपये
2024 Renault Kwid RXT AMT ची किंमत 5.95 लाख रुपये
2024 Renault Kwid Climber AMT ची किंमत 6.12 लाख रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.