Gold Price Fall Saam TV
बिझनेस

Gold Price Today : ग्राहकांना दिलासा, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; पाहा आजचा सोन्याचा भाव

Gold Price Today : आज सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदीचा विचार करू शकता. आज १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,12,600 रूपये इतकी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. सध्या सणासुदीचे आणि लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. या काळात सोन्याची मागणी वाढत असल्याने दरामध्ये बदल होत असतो. आज सलग तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचे भाव घसरले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदीचा विचार करू शकता.

Goodreturns वेबसाईटनुसार, शनिवारी म्हणजेच आज १८ जानेवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,12,600 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,450 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,600 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,500 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,45,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,12,600 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 81,260 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,008 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,126 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,435 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,111 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,435 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,111 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,435 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,111 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,435 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,111 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,435 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,111 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,435 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,111 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,435 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,111 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,435 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,111 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,438 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,114 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,438 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,114 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,438 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,114 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

SCROLL FOR NEXT