RBI MPC Meet 2024 Saam Tv
बिझनेस

RBI MPC Meet 2024: आरबीआयचा रेपो रेटबाबत मोठा निर्णय, गृह आणि कार लोनमध्ये बदल होणार?

RBI Repo Rate Unchange: आरबीआयने पतधोरण बैठकीनंतर रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग दहाव्यांदा रेपो रेट ६.५ टक्केच आहे.

Siddhi Hande

आरबीआयने पतधोरण बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीसीने सलग दहाव्यांदा रेपो रेट स्थिर ठेवले आहे. पतधोरण बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शक्तिकांत दास यांनी सांगितले की, पुन्हा एकदा रेपो रेट ६त५ टक्के ठेवण्यात आले आहे.रेपो रेट तसाच राहिल्याने कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. यामुळे तुमच्या गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जावर कोणताही परिणाम होणार नाही. (RBI Repo Rate)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील चढ-उतारनंतरही चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यात आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी हे धोरण फायदेशीर ठरले आहे. त्यामुळेच यावर्षीही रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला आहे.यामुळे या वर्षी महागाई कमी होण्याची शक्यता आहे.

रेपो रेटमध्ये कपात कधी होणार?

आरबीआयच्या या निर्णयानंतर आता पुढील पतधोरण आढावा बैठकीत रेपो रेट कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महागाई हा खूप चिंतेचा विषय आहे. याचा परिणाम कच्च्या तेलावर आणि वस्तूंच्या किंमतीवर होत आहे. त्यामुळे महागाई पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तलली जात आहे. (RBI Repo Rate Still Same)

मागील महिन्यात अमेरिकन फेडरल बँकेने बेंचमार्क दर ०.५ टक्क्यांनी कमी केले आहेत. याशिवाय इतर अनेक देशांनही व्याजदरात कपात केली आहे. परंतु आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

Famous Singer Death : संगीत क्षेत्रातला अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

महागड्या क्रिम्स कशाला? चेहऱ्याचे काळे डाग आणि खाज घालवण्यासाठी कापूर ठरेल वरदान; पाहा वापरण्याची योग्य पद्धत!

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

SCROLL FOR NEXT