RBI Repo Rate
RBI Repo Rate  Saam Tv
बिझनेस

RBI Repo Rate : सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; रेपो रेट जैसे थे; Home Loan, Car Loan च्या EMI वर काय परिणाम होणार?

कोमल दामुद्रे

Reserve Bank Of India :

देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआयने अलीकडे रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाहीये.

फेब्रुवारी २०२४ मध्ये व्याजदर कमी होण्याची शक्याता वर्तवण्यात आली होती. परंतु, आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीत रेपो रेट जैसे थेच आहेत. ८ फेब्रुवारीला आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी आर्थिक आढावा बैठकीचे निकाल जाहीर केले. यात मध्यवर्ती बँकेने पुन्हा एकदा रेपो दर कायम ठेवला असून त्यात कोणतेगी बदल केले नाही. आरबीआयच्या (RBI) निर्णयानंतर पुन्हा एकदा व्याजदर (Loan) ६.५ टक्के ठेवण्यात आला आहे. यावेळी रेपो रेटमध्ये बदल होतील अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती.

1. वर्षभरापासून दर स्थिर

आरबीआयने जवळपास मागच्या वर्षभरापासून रेपो रेट ६.५० टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. आरबीआयने गेल्या वर्षभरात फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दर ६.२५ टक्क्यांपर्यंत ०.२५ टक्क्यांनी वाढवला होता. त्याचवेळी डिसेंबर २०२३ मध्ये महागाईचा दर ५.६९ टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र यावेळी ग्राहकांना रेपो रेटमध्ये बदल होण्याची शक्यचा कमी होती. रेपो रेटमध्ये बदल न झाल्यामुळे होम लोन आणि कार लोनचा हप्ता सर्वसामान्यांना पूर्वीसारखाच भरावा लागणार आहे.

2. रेपो रेट किती?

तुम्ही जर बँकेतून कर्ज घेत असाल तर सार्वजनिक आणि व्यावसायिक बँकाही आरबीआयकडून कर्ज घेतात. जसे तुम्ही कर्जावर व्याज भरता तसे बँकांनाही (Bank) व्याज द्यावे लागते. आरबीआय या व्याजदराला रेपो रेट म्हणून ओखळते. रेपो रेट कमी झाला की, बँकांना स्वस्तात कर्ज मिळते. त्यांचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली चंद्रा...

IND vs ZIM: IPLनंतरही अभिषेक शर्माचा धमाका कायम; ठोकलं आंतरराष्ट्रीय टी २० करिअरमधलं पहिलं वहिलं शतक

Dupatta Styling : दुपट्टा सावरताना नाही उडणार तारांबळ, या पद्धतीने वेअर केल्यास येईल स्टायलिश लूक

Sayali Sanjeev : सायली संजीवचा परदेश दौरा...

Worli Hit And Run Case: अपघातपूर्वीचे CCTV फुटेज आले समोर, कारमधून उतरताना दिसला मिहीर शहा

SCROLL FOR NEXT