Gold Monetization Scheme Saam tv
बिझनेस

Gold Monetization Scheme 2026: कपाटातलं सोनं बनवा कमाईचं साधन; RBI च्या गोल्ड मॉनेटायझेशन स्कीममध्ये मिळवा बंपर व्याज

Gold Monetization Scheme 2026: RBI च्या गोल्ड मोनेटायझेशन योजनेत मोठे बदल होणार आहेत. येत्या काळात व्याजदर ४% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नव्या सुधारित योजनेचा गुंतवणूकदारांना अधिक फायदा होऊ शकतो.

Shruti Vilas Kadam

Gold Monetization Scheme 2026: देशात सोन्याच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक(RBI) आपल्या गोल्ड मोनेटायझेशन योजनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या योजनेतील व्याजदर वाढवून सुमारे ४ टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

सध्या या योजनेअंतर्गत व्याजदर साधारण २.२५ ते २.५० टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या योजनेकडे फारसे आकर्षित झाले नाहीत. याच पार्श्वभूमीवर व्याजदर वाढवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. ज्यामुळे अधिक लोक आपले घरी ठेवलेलं सोनं बँकिंग व्यवस्थेत आणण्यास उत्सुक होतील.

लोकसत्ताच्या माहितीनुसार, गोल्ड मोनेटायझेशन योजना २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश घरांमध्ये आणि संस्थांकडे पडून असलेले सोने आर्थिक प्रवाहात आणणे हा होता. यामुळे देशातील सोन्याच्या आयातीवरील अवलंब कमी होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.

दरम्यान, या योजनेत काही बदल आधीच करण्यात आले आहेत. २०२५ पासून मध्यम आणि दीर्घकालीन ठेवी (MLTGD) बंद करण्यात आल्या असून सध्या केवळ अल्पकालीन ठेवींचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे योजनेची लोकप्रियता कमी झाल्याचेही दिसून आले.

तज्ज्ञांच्या मते, व्याजदर वाढवण्याबरोबरच डिजिटल प्रणाली, पारदर्शकता आणि सुलभ प्रक्रिया करण्यावरही भर दिला जात आहे. यामुळे अधिक गुंतवणूकदार सहभागी होतील आणि देशातील सोन्याचा साठा आर्थिकदृष्ट्या अधिक उपयोगात येईल. एकूणच, RBI च्या या नव्या धोरणामुळे सोन्याच्या गुंतवणुकीत मोठा बदल होण्याची शक्यता असून, आगामी काळात या योजनेला नवी गती मिळेल, असे संकेत मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; आमदार-खासदारांचे नियोजित दौरे रद्द, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update : नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव

Maharashtra Governmnet: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय

Shocking: सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरची निर्घृण हत्या, बायकोला संपवून नवऱ्याने केली आत्महत्या

Summer Skin Care: उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन वापरावे? खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

SCROLL FOR NEXT