RBI Interest Rate saam tv
बिझनेस

RBI Interest Rate : खुशखबर! 5 लाख रुपये गुंतवले तर मिळणार 18 हजारांहून जास्त व्याज! RBI चा मोठा निर्णय

Government Floating Rate Bonds : RBI ने फ्लोटिंग रेट बॉन्ड २०२४ वरचे व्याजदर व्याजदर वाढवून ७.२६ टक्के केला आहे.

Sakshi Sunil Jadhav

सध्या वाढत्या महागाईमध्ये बचत करणं खूप कठीण झालंय. पण बचतच केली नाही तर भविष्यात लाइफस्टाइलवर मोठा बदल होऊ शकतो. बचत करताना आपण जिथून आपल्या गुंतवणूकीच्या डबल पैसा आपल्याला मिळेल असा पर्याय शोधत असतो. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. RBI ने भारत सरकारच्या फ्लोटिंग रेट बॉन्ड २०३४ (FRB 2034) वरच्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. याआधी या बॉन्डवर वार्षिक ६.४५ टक्के व्याज मिळत होते. आता हा दर वाढवून ७.२६ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे या बॉन्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आर्थिक व्याज मिळणार आहे.

७.२६ टक्के व्याजदर कधीपासून लागू?

RBI ने जाहीर केलेला नवीन व्याजदर ३० ऑक्टोबर २०२६ ते २९ एप्रिल २०२७ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. याआधी ३० एप्रिल ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ६.४५ टक्के व्याजदर होता. आता त्यात ०.८१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

फ्लोटिंग रेट बॉन्ड म्हणजे काय?

फ्लोटिंग रेट बॉन्ड २०३४ हा भारत सरकारचा गुंतवणूक पर्याय असून तो जानेवारी २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. या बॉन्डचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरचे व्याजदर कायमस्वरूपी ठरलेले नसतात. दर सहा महिन्यांनी ठरावीक निकषांनुसार त्यातमध्ये बदल केला जातो. त्यामुळे बाजारातल्या व्याजदरातल्या बदलांचा परिणाम या बॉन्डच्या परताव्यावर होतो.

व्याजदर ७.२६ टक्के कसा ठरवला?

RBI च्या माहितीनुसार, १८२ दिवसांच्या ट्रेझरी बिलांच्या (T-Bills) मागच्या तीन लिलावांमधील वेटेड अॅव्हरेज यील्डचा आधार घेतला जातो. यामध्ये सरकारने निश्चित केलेला ०.९८ टक्के अतिरिक्त स्प्रेड जोडला जातो. ७,१४ आणि २८ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या लिलावांचा सरासरी दर ६.२७८३ टक्के होता. त्यात ०.९८ टक्के जोडल्याने नवीन व्याजदर ७.२६ टक्के झाला.

५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती फायदा?

समजा तुम्ही या बॉन्डमध्ये ५ लाख रुपये गुंतवले, तर सहा महिन्यांच्या हिशोबाने अंदाजे कमाई पुढीलप्रमाणे असेल. जुना व्याजदर हा ६.४५ टक्के होता. तर १६,१२५ रुपये फायदा होईल. नवीन व्याजदर ७.२६ टक्के आहे. यामध्ये १८१५० रुपये फायदा होईल. तसेच जास्तीचा फायदा हा २,०२५ रुपये होईल. म्हणजेच, आधीच्या सहा महिन्यांच्या तुलनेत नवीन व्याजदरानुसार ५ लाखांच्या गुंतवणुकीवर अंदाजे २,०२५ रुपये जास्त व्याज मिळू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमारांविरोधात 'जनमहाभियोग'

तिसरीतील विद्यार्थ्याचा 6 वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला; डोक्यात दगड आणि कुंडीच घातली अन् फरफटत... CCTV

Political News: शिवसेना नेत्यावर गोळीबार प्रकरण, छोटा राजनसह ५ जणांची निर्दोष मुक्तता

राणा सूर्यवंशीला Y प्लस सुरक्षा कोणी आणि कोणत्या निकषांवर दिली? शिंदे गटाकडून चौकशीची मागणी

Gharkul Yojana : घरकुल योजनेत महिलांना मिळणार नवीन घरासाठी सरकारी अनुदान? नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT