Ration Card  META AI
बिझनेस

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Ration Card PHH or AAY: रेशन कार्डावरील PHH किंवा AAY श्रेणीनुसार दरमहा मिळणाऱ्या धान्याचे प्रमाण ठरते. PHH लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ५ किलो, तर AAY कुटुंबांना ३५ किलो धान्य मिळतं.

Sakshi Sunil Jadhav

रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेशन कार्ड हे फक्त स्वस्त दरात धान्य देण्यासाठीचे कार्ड नाही, तर त्यावर नमूद केलेली श्रेणी तुमच्या कुटुंबाला किती रेशन मिळणार हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे रेशन घेताना आपल्या कार्डावर PHH की AAY यापैकी कोणती श्रेणी नमूद आहे, हे प्रत्येक लाभार्ख्याने तपासणे गरजेचे आहे.

PHH म्हणजे काय?

PHH म्हणजे प्राधान्य कुटुंब Priority Household. या श्रेणीतल्या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार साधारणपणे प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो धान्य मिळतं. त्यामुळे कुटुंबाकील सदस्यांची संख्या जितकी जास्त तितके मंजूर धान्याचे प्रमाण त्यानुसार ठरते. उदाहरणार्थ, एखाद्या कुटुंबात ४ सदस्य असतील, तर नियमानुसार त्यांना दरमहा २० किलो धान्य मिळण्याचा हिशोब होऊ शकतो.

AAY म्हणजे काय?

AAY म्हणजे अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana). या श्रेणीतील अत्यंत गरीब आणि पात्र कुटुंबांसाठी प्रति कुटुंबांसाठी प्रति कुटुंब दरमहा ३५ किलो धान्य देण्याची तरतूद आहे. म्हणूनच PHH आणि AAY या दोन्ही श्रेणींचे धान्य मिळण्याचे प्रमाण वेगळे आहे. रेशन दुकानातून धान्य घेताना आपल्या कार्डावरील श्रेणी आणि त्यानुसार मिळणारे प्रमाण माहिती असणे महत्त्वाचे आहे.

रेशन घेताना या गोष्टी लक्षात ठेवा

रेशन कार्डावर PHH किंवा AAY कोणती श्रेणी आहे, ते तपासा. कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि मंजूर धान्याचे प्रमाण जाणून घ्या. रेशन घेतल्यानंतर पावती किंवा व्यवहाराची नोंद तपासा. मंजूर प्रमाणापेक्षा कमी धान्य मिळाल्यावर संबंधित यंत्रणेकडे तक्रार करता येते. आपल्या कार्डावरील माहिती आणि लाभाची नोंद अद्ययावत आहे का, हेही वेळोवेळी तपासा. तुमच्या रेशन कार्डावर PHH आहे की AAY? हे जाणून घेतल्याने दर महिन्याला तुम्हाला किती धान्य मिळायला हवं, याचा योग्य हिशोब ठेवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT