Spicejet Offer For Ayodhya Flight Google
बिझनेस

Spicejet Offer: मुंबई ते अयोध्या विमानप्रवास फक्त १६२२ रुपयांत; स्पाइसजेट कंपनीची प्रवाशांसाठी खास ऑफर

Mumbai To Ayodhya Flight Offer: २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन झाले. राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त एअरलाइन कंपनीने प्रवाशांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Spicejet Offer For Ayodhya Flight Travel In 1622 Rupess:

२२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. परदेशातही राम मंदिराच्या उद्घाटनाचा आनंद साजरा केला आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त आता एअरलाइन कंपनीनेदेखील प्रवाशांसाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. (Latest News)

स्पाइसजेट या एअरलाइन कंपनीने वेगवेगळ्या शहरातून अयोध्येत विमानसेवा सुरू केली आहे. कंपनीने १६२२ रुपयांमध्ये फ्लाइट तिकीटे देण्याचे जाहीर केले आहे. कंपनी १६२२ रुपयांत मुंबई गोवा, दिल्ली- जयपूर, गुवाहाटी-बागडोगरा हे फ्लाइट तिकीट देते. त्यानंतर आता देशातील इतर भागांतून अयोध्येला जाणारी विमानसेवा कंपनी सुरु करणार आहे.

स्पाइसजेट कंपनी १ फेब्रुवारीपासून अयोध्येत विमानसेवा सुरु करणार आहे. विमानाची उड्डाणे चैन्नई, दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, बेंगळुरु, जयपूर, पटना, दरभंगा या शहरांतून होणार आहेत.

स्पाइसजेटची ही ऑफर २२ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही ऑफर २८ जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे. हा प्रवास तुम्ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत करु शकता. ही ऑफर काही शहरांमधूनच सुरु करण्यात आला आहे. ग्रुप बुकिंगसाठी ही ऑफर नाही आहे. तसेच जर तुम्ही तिकीट रद्द केले तर तुम्हाला काही चार्जसह पैसे परत दिले जातील. या ऑफरमध्ये तुम्हाला जेवणावर ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. तुम्ही हे बुकिंग स्पाइसजेटच्या अॅपवरुन करु शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकरीच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शांतता कालावधी सोमवारच्या संध्याकाळपर्यंत

Manipur Politics : भाजपला मोठा झटका; NPPने पाठिंबा काढला, मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं?

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

SCROLL FOR NEXT